शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
9
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
10
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
11
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
12
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
13
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
14
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
15
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
16
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
17
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
18
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
19
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
20
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी

माकपा शेतमजूर संघटनांचा भव्य मोर्चा

By admin | Updated: October 13, 2015 01:42 IST

जव्हार, मोखाडा, वाडा, व विक्रमगड तालुक्यातील मार्सवादी कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी, शेतमजूर संघटना व आदिवासी अस्मिता संघटना, शेतकरी शेतमजूर संघटना

जव्हार : जव्हार, मोखाडा, वाडा, व विक्रमगड तालुक्यातील मार्सवादी कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी, शेतमजूर संघटना व आदिवासी अस्मिता संघटना, शेतकरी शेतमजूर संघटना या मोर्च्यात सामील होवून विविध मागण्यासाठी सोमवारी विविध मागण्यांसाठी माकपाच्या संघटनांनी उप जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.कॉ. गोदावरी श्यामराव परुळेकांच्या क्रांतिकारक स्मृती दिनाला अभिवादन करत या माकपा शेतकरी, शेतमजूर मोर्च्या दरम्यान, जव्हार उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले होते. जव्हार, मोखाडा, विक्रमगड, व वाडा, या आदिवासी शेतमजूर तालुक्यात भाजीपाल, फळे, भात, वरई, नाचणी, या पिकांचे उत्पन्न शेतक-यांकढून खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन बाजार केंद्रे सुरु करा. वन हक्क कायद्याची वन जमीन जीपीआरएसने मोजमाप करून सात बारा द्यावा. जव्हार पतंगशाहां ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या. रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरु करा. चारही तालुक्यात नळ पाणीपुरवठा योजना सुरु करा. रेशनकार्ड धारक लाभार्थ्यांना वेळेत रेशनवरील धान्य मिळाले पाहिजे. घरकुल योजनेत लाभार्थांची होणारी फसवणूक व भ्रष्टाचार हाणून पाडा. अंगणवाडी सेविका, आशा सेविका व पाडा स्वयंसेविका यांना कायम स्वरूपी करून घ्या. अशा विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या. यावेळी कॉ. काळूराम लोखंडे, बबन काकरा, आदेश बनसोडे, चंद्रकांत फुफाने, कॉ. भरत कारिया, शंकर बदादे, रामू कडू, असे मान्यवर व कार्यकर्ते, शेतमजूर, व संघटनाचे पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी उप जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.जव्हार तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्याकर्त्यांनी आज जव्हार बसस्टॉप समोरील नगरपरिषदेचे ग्राउंड ते गांधी चौक, पाचबाती नाका, व यशवंतनगर मोर्च्यावरून प्रांत कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात माकपाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होवून, मोर्च्या दरम्यान विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनावेळी करण्यात आलेल्या विविध मागण्या शालेय पोषण आहार ठेकेदारांना देण्याचे रद्द कारा, या वर्षी पाऊस कमी पडल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार हमीची कामे करण्यासाठी आराखडे तयार करण्याचे आदेश द्यावे, शासकीय आश्रम शाळेतील भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे, आश्रम शाळेतील अंडी, केळी, सफरचंद वाटप करण्याचा ठेका स्थानिक बचत गटांना द्यावा, प्राथमिक आरोग्या केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात यावी, तालुक्यातील उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती सुरु करा, वनजमिनीचा ७/१२ चा उतारा जीपीस नी मोजणी करून वाढीव क्षेत्र देण्यात यावे, जमीन अधिग्रहण कायदा रद्द करा,असा विविध मागण्याची मोर्च्या दरम्यान मागणी करण्यात आल्या आहेत. यावेळी माहाराष्ट्र राज्य कमिटी मेंबर कॉ- रतन बुधर, तालुका सेक्रेटरी- कॉ यशवंत घटळ, जिल्हा कमिटी मेंबर- कॉ- लक्ष्मण जाधव, जिल्हा कमिटी मेंबर कॉ- शिवराम घटळ, जिल्हा कमिटी सदस्य कॉ- बाबू ढिगारे, कॉ- विजय शिंदे, कॉ- यशवंत बुधर, व माकपाचे शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. (वार्ताहर)