शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात लहान मुलांसाठी १०० खाटांचा कोविड कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST

ठाणे : महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी ठाणे ग्लोबल हॅास्पिटलला भेट देऊन तेथील मृत्युदर कमी करण्यासाठी ...

ठाणे : महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी ठाणे ग्लोबल हॅास्पिटलला भेट देऊन तेथील मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना करून आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी १०० खाटांचा स्वतंत्र कक्ष निर्माण करून तज्ज्ञ डॉक्टर नेमणे, आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी करणे, ॲाक्सिजनच्या पुरवठ्याची तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या.याठिकाणी १०० बेडची व्यवस्था करण्यात येत असून त्यामध्ये ३ ते १४ वयोगटातील मुलांचे नियोजन केले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

पार्किंग प्लाझा येथील १०० बेडमध्ये ५० ऑक्सिजनचे, २५ आयसीयु आणि २५ आयसीयु व्हेंन्टिलेटरचे बेड असणार आहेत. याशिवाय लहान मुले ही एकटी राहू शकत नसल्याने त्यांच्याबरोबर आई, किंवा वडील राहू शकतील अशा पद्धतीचे मोठे बेड उपलब्ध केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान कोविड रुग्णांचा मृत्युदर कमी करण्याबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सकाळी ठाणे ग्वोबल हॅास्पिटलला भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, विश्वनाथ केळकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, ग्लोबल हॅास्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर, आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महापालिका आयुक्तांनी आयसीयू कक्षामध्ये तज्ज्ञ डॅाक्टरांची आवश्यकता असल्यास ते तातडीने नेमण्याच्या सूचना करून व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले.