शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रत्नाकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

By admin | Updated: August 27, 2015 00:09 IST

२ जून रोजी इंदगाव येथील रत्नाकर महाराजांच्या साधना केंद्रात दरोडा टाकल्याचा गुन्हा बदलापूरचे नगरसेवक आशीष दामले यांच्यावर दाखल करण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणाला

बदलापूर : २ जून रोजी इंदगाव येथील रत्नाकर महाराजांच्या साधना केंद्रात दरोडा टाकल्याचा गुन्हा बदलापूरचे नगरसेवक आशीष दामले यांच्यावर दाखल करण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून या साधना केंद्रातील मठाचे संचालक नरेश रत्नाकर आणि ओंकार रत्नाकर यांच्यावरच हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश उल्हासनगर न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या प्रकरणात आशीष दामले हे नरेश रत्नाकर यांच्या साधना केंद्रात गेले असता या वेळी रत्नाकर यांनी गोळीबार केल्याचे दामले यांचे सहकारी व या प्रकरणातील फिर्यादी केतन शेळके यांनी कोर्टाला सांगितले होते. या फिर्यादीवरून उल्हासनगर येथील न्यायालयाच्या आदेशाने नरेश रत्नाकर व ओंकार रत्नाकर यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी रत्नाकर यांच्यावर बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. तसेच नरेश रत्नाकर यांनी सीसीटीव्ही फुटेजचा वापर हा आपल्या सोयीनुसार केल्याचेही कोर्टाने नमूद केले. दामले यांनी रत्नाकर महाराज यांच्या साधना केंद्रात दरोडा टाकल्याचा गुन्हा चांगलाच गाजला होता. तसेच या प्रकरणी ते न्यायालयीन कोठडीतही होते. दरोड्याचा आरोप खोटा असल्याचे दामले यांनी या आधीच स्पष्ट केले होते. तसेच रत्नाकर महाराज हे गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे खुलासे आपण करणार असल्याचे त्यांनी या आधीच स्पष्ट केले होते. त्यानंतर, आता रत्नाकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने दामले यांनी समाधान व्यक्त केले आहे.