शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडप्रकरणी पालिका न्यायालयात जाणार? नौपाडा पोलिसात तक्रार, प्रशासन आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 04:41 IST

रेल्वेच्या बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणामध्ये आता ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेने नौपाडा पोलीस ठाण्यात रेल्वे प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

ठाणे : रेल्वेच्या बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणामध्ये आता ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेने नौपाडा पोलीस ठाण्यात रेल्वे प्रशासनाविरोधात तक्र ार दाखल केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन आणि संवर्धन कायदा १९७५ कलम ८ (१) नुसार तक्र ार दाखल करून घेण्यात आली आहे. तक्र ारीची हीच प्रत घेऊन आता ठाणे महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कोर्टात जाण्याची शक्यता आहे.ठाणे रेल्वेस्थानकाच्या फलाट क्र मांक-१ आणि २ च्या मधोमध असलेली चार मोठी झाडे मुळासकट तोडल्याचा प्रकार ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ कारवाई करून यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठवून २४ तासांच्या आत यासंदर्भात खुलासा करण्याची सूचना केली होती. त्यानंतर, आता नौपाडा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी मात्र अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. परंतु, एवढ्यावर न थांबता आता हे प्रकरण न्यायालयात घेऊन जाण्याची तयारी वृक्ष प्राधिकरण विभागाने केली आहे. पोलिसांनी तक्रारीची जी प्रत ठाणे महापालिकेला दिली आहे, ती महापालिका कोर्टात सादर करणार आहे. वृक्षतोड करण्याचा अधिकार संबंधित विभागाला असल्याचा खुलासा रेल्वेने केला होता.यापूर्वी का पाठवले प्रस्तावयापूर्वी रेल्वेने ठाणे महापालिका क्षेत्रातील झाडे तोडण्याचे १० ते १५ प्रस्ताव महापालिकेकडे का पाठवले होते, असा मुद्दा आता उपस्थित झाला आहे.याला जबाबदार ओव्हरहेड वायर विभाग आणि स्टेशन प्रबंधक यांना प्रतिवादी बनवणार आहेत.

टॅग्स :thaneठाणे