शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जनसुनावणी घेऊन न्यायालयाचा अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:59 IST

श्रीनगर भागातील आपली बांधकामे अधिकृत असून ज्या प्रकरणाची सुनावणी न्यायप्रविष्ट आहे, त्याची जनसुनावणी घेणे हा न्यायालयाचा अवमान

ठाणे : श्रीनगर भागातील आपली बांधकामे अधिकृत असून ज्या प्रकरणाची सुनावणी न्यायप्रविष्ट आहे, त्याची जनसुनावणी घेणे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे सांगून त्याविरोधात तक्रार करणारे प्रदीप इंदुलकर हे सुपारीबाज असल्याचा आरोप काँगे्रसचे शहर अध्यक्ष नगरसेवक मनोज शिंदे यांनी केला आहे.वागळे इस्टेट भागातील श्रीनगरमधील चार बेकायदा बांधकामासंदर्भात प्रदीप इंदुलकर यांनी महापालिकेकडे तक्र ारी केल्या आहेत. त्यामध्ये श्रीनगर येथील कार्यालय आणि त्या मागील नाल्यावर झालेले बांधकाम, रमा माधव इमारतीसमोरील रिक्रिएशन ग्राउंडवर होणारे पार्किंग, आर्शिवाद बंगल्यात झालेले अनधिकृत बांधकाम आणि श्रीनगर मार्केट (श्री मंगल कार्यालय) येथे उभारण्यात आलेले मंडप या चार बांधकामांचा समावेश आहे. या बांधकामांबाबत निर्णय घेण्यासाठी महापालिकेने तेथील स्थानिक नागरिकांची मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी २१ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयात जनसुनावणी ठेवली आहे. या संदर्भात इंदुलकर यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यावर अद्यापही सुनावणी होणे शिल्लक आहे. परंतु, केवळ या अनधिकृत बांधकामांना वाचविण्यासाठी पालिकेने ही जनसुनावणी ठेवली असल्याचा आरोपही इंदुलकर यांनी केला आहे.या बाबत अखेर शिंदे यांनी मौन सोडले असून या बांधकामांशी माझा कोणत्याही प्रकारचा संबध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वागळे इस्टेट भागात केवळ श्रीनगर हेच अधिकृत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. इंदुलकर यांनी मागील २५ वर्षांपासून या बाबत तक्रारी सुरू केल्या आहेत. परंतु, त्यांच्या हाती काहीच न लागल्याने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.