शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

छताचे प्लास्टर पडून दाम्पत्य जखमी; राबोडीतील घटना 

By अजित मांडके | Updated: November 6, 2024 15:27 IST

झाकीर यांच्या उजव्या पायाला व दोन्ही हाताला आणि हिना यांच्या चेहऱ्याला व पाठीला दुखापत झाल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राबोडी नंबर ०२, या ठिकाणी असलेल्या हूमा अपार्टमेंट या इमारतीच्या ०२ ऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक ०९ मधील बेडरूमच्या छताचे प्लास्टरचा काही भाग पडल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास समोर आली. यामध्ये झाकीर हुसेन सलमानी (४२) आणि त्यांची पत्नी हिना (३८) हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. झाकीर यांच्या उजव्या पायाला व दोन्ही हाताला आणि हिना यांच्या चेहऱ्याला व पाठीला दुखापत झाल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. 

राबोडी दोन येथे तळ अधिक ४ मजली इमारत आहे. या ३५ वर्षे जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर ९ हा आबिदा वायदा शेख यांच्या मालकीचा आहे. तेथे सद्यस्थितीत जखमी झाकीर हे कुटुंबास वास्तव्यास आहेत. त्याच रूममधील बेडरूमच्या छताचे प्लास्टरचा काही भाग बुधवारी सकाळी पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा उपअभियंता-सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी (उथळसर प्रभाग समिती), अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (उथळसर प्रभाग समिती) यांनी धाव घेतली. या घटनेत झाकीर आणि त्यांची पत्नी हिना असे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे