शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक कचरा प्रक्रियेचा खर्च अडीच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 03:07 IST

एमआयडीसीतील रासायनिक आणि कापडावर प्रक्रिया करणाऱ्या एकूण ३७५ कारखान्यांमध्ये तयार होणा-या घनकच-यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी दरवर्षी अडीच कोटी रुपयांचा खर्च होत आहे.

मुरलीधर भवार डोंबिवली : एमआयडीसीतील रासायनिक आणि कापडावर प्रक्रिया करणाऱ्या एकूण ३७५ कारखान्यांमध्ये तयार होणा-या घनकच-यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी दरवर्षी अडीच कोटी रुपयांचा खर्च होत आहे.एमआयडीसीतील फेज १ आणि फेज २ मधील कारखान्यांमध्ये उत्पादनानंतर दररोज ५० मेट्रीक टन रासायनिक घनकचरा तयार होतो. हा कचरा इतरत्र न टाकता तो तळोजो येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत प्रक्रियेसाठी पाठवला जातो. त्यासाठी कारखानदार पैसा खर्च करतात. शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी कारखानदारांना दरवर्षी अडीच कोटी रुपये मोजावे लागतात.वास्तविक कारखाने हे एमआयडीसीच्या अखत्यारित येतात. त्यामुळे कारखान्यांना सेवासुविधा पुरवणे हे एमआयडीसीचे काम आहे. रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सीईटीपी) योग्य प्रक्रिया केली जात नसल्याचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादाकडे उपस्थित केला गेला. त्यावेळी हे केंद्र चालवण्याची जबाबदारी कारखान्यांची नसून, ती एमआयडीसीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एमआयडीसीने सीईटीपीच्या अपग्रेडेशनसाठी १०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. तसेच कारखानदारांवरील जबाबदारीचे ओझे कमी होणार आहे.सीईटीपी केंद्राप्रमाणे रासायनिक घनकचºयाची विल्हेवाट लावण्यासाठीही एमआयडीसीने पुढाकार घ्यावा, अशी गरज कारखानदार व्यक्त करत आहेत.२००२ मध्ये केडीएमसी हद्दीतील २७ गावे वगळल्यावर कारखानेही जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेले. मात्र, १ जून २०१५ मध्ये ही गावे आणि एमआयडीसी परिसर पुन्हा महापालिकेत सामाविष्ट झाला. परंतु, कारखान्यांच्या हद्दीसाठी महापालिका व एमआयडीसी अशा दोन नियोजन प्राधिकरणांकडे हा कारभार आहे. महापालिकेचे घनकचरा प्रकल्प हे पर्यावरण खात्याच्या ‘ना हरकत दाखल्या’अभावी रखडले आहेत. महापालिकेच्या जैववैद्यकीय घनकचरा प्रकल्पही उभारून तयार आहे. मात्र, त्यालाही ना हरकत दाखला मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका रासायनिक कचºयावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी तूर्तास तरी घेणार नाही. तसेच एमआयडीसीकडून अद्याप तसा काही विचार पुढे आलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.रासायनिक सांडपाणी प्रक्रियेनंतर खाडीत दूरवर सोडण्याचे आदेश आहेत. सीईटीपीपासून ठाकुर्ली रेल्वेमार्गापर्यंत बंदिस्त सांडपाणी वाहनी टाकण्याचे काम झाले आहे.रेल्वेमार्गापासून कल्याण खाडीत सात किलोमीटर वाहिनी टाकून सांडपाणी सोडण्याबाबत वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अधीक्षक अभियंता रमाकांत पंडितराव यांच्याकडे २४ जानेवारी २०१८ ला पत्राद्वारे केली होती. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अभियंता संजय सेठी यांनी १५ फेब्रुवारी २०१८ ला याप्रकरणी अहवाल पाठवला आहे. त्यानुसार ही वाहिनी टाकण्यासाठी लवकरच निविदा निघणार आहे.