शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकीत गैरप्रकार रोखणार ‘कॉप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:58 IST

मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी, प्रलोभने दाखवली जात असतील तर ती रोखण्यासाठी आणि आणि आचारसंहितेचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी, प्रलोभने दाखवली जात असतील तर ती रोखण्यासाठी आणि आणि आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी निवडणूक आयोग ‘सिटीझन आॅन पेट्रोल’ या अ‍ॅपचा वापर करणार आहे. प्रत्येक प्रभाग समितीत दर दोन किमीच्या परिसरासाठी तीन जागरुक नागरिकांची टीम तयार केली जात आहे. त्यामुळे आमिषे दाखवणाऱ्यांवर त्वरित कारवाई करता येईल. राज्य निवडणूक आयोगाने सिटिझन आॅन पेट्रोल अर्थात ‘कॉप’ नावाच्या मोबाईल अ‍ॅपचा वापर सुरू केला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. निवडणूक प्रचारातील गैरप्रकारांना आळा घालणे हा या मागचा उद्देश आहे. निवडणुकांमध्ये सर्रास पैसे, भेटवस्तू, गिफ्ट कूपन, मद्य वाटप, पार्ट्या आदी गैरप्रकार चालतात. शिवाय मतदारांना भुलवणाऱ्या जाहिराती-घोषणा केल्या जातात. बेकायदा बॅनर, होर्डिंग, फलक, पोस्टर लावले जातात. उमेदवार व राजकीय पक्षांकडून आपल्या प्रचारासाठी, विरोधकांविरुध्द सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. प्रार्थनास्थळे, लहान मुले-प्राण्यांचा प्रचारात वापर करण्यास मनाई असते. तो बंदीही अनेकदा धुडकावली जाते. ध्वनिक्षेपकांचा गैरवापर होतो. मतदानादिवशी मतदारांना केंद्रापर्यंत ने-आण करण्यास वाहने पुरवली जातात. याबद्दल तक्रारी होतात. पण पुरावे नसतात. पण आता कोणताही नागरिक या गैरप्रकारांचे फोटो काढून उमेदवार, पक्षाचा तपशील देत त्याची तक्रार करू शकणार आहे. यात साधारण २० प्रकारच्या गैरप्रकारांबद्दल तक्रार करता येणार आहे. आचारसंहिता लागू होताच या ‘कॉप अ‍ॅप’साठी जनजागृती सुरू झाली आहे. पालिकेच्या सहाही प्रभाग समितीत प्रत्येकी दोन किमी अंतरावर तीन जागरुक नागरिकांचे पथक तयार करण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. कोणताही आचारसंहिता भंग, गैरप्रकार त्यांना दिसल्यास फोटोसह ते तक्रार करू शकतील आणि प्रभाग अधिकारी, आचारसंहिता पथकप्रमुखांसह वेगवेगळ््या अधिकाऱ्यांना फोन करून सांगू शकतील. तक्रारदाराचे नाव गोपनीय राहिल असे अधिकारी सांगत असले, तरी पालिकेतून ते नाव फुटल्यास जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे, असे मत या जागरूक नागरिकांनी मांडले आहे.फोटो काढा, तक्रार कराप्रभागातील उमेदवार आणि राजकारण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी जागरूक नागरिकांवर सोपवायची आणि त्यांना कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्याचे छायाचित्र काढून ते थेट ‘अ‍ॅप’वरून तक्रार करु शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.