शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

थीम पार्कच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे प्रशासनाने केले मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 02:20 IST

घोडबंदर भागात उभारलेल्या थीम पार्क (जुने ठाणे नवीन ठाणे) च्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे गुरुवारी झालेल्या महासभेत राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सादर केले.

ठाणे  - घोडबंदर भागात उभारलेल्या थीम पार्क (जुने ठाणे नवीन ठाणे) च्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे गुरुवारी झालेल्या महासभेत राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सादर केले. त्यानंतर, प्रशासनाने या आरोपात तथ्य असल्याचे सांगितले. त्यानुसार, याच्या चौकशीसाठी आयुक्त, माजी महापौर, नजीब मुल्ला, आॅडिटर यांची समिती नेमण्याचा ठराव करून दोषी ठरणाऱ्या अधिकाºयावर कारवाई केली जाणार आहे.सभागृह नेते नरेश म्हस्के आणि नजीब मुल्ला यांनी या विषयाला हात घातला. मुल्लांनी तर पुरावेच सादर केले. येथील ट्रेनसाठी एक कोटी ६५ लाख, महाराजांच्या पुतळ्यासाठी ८० लाख, जमीन खोदण्यासाठी पाच कोटी असे पुरावे त्यांनी सादर करून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. वास्तविक पाहता हे काम दोन कोटींचेही नसताना त्यावर १६ कोटी ३२ लाखांचा खर्च झालाच कसा, यासाठीचा निधी कोणत्या हेडमधून खर्च केला, असे प्रश्न विचारून सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला अडचणीत आणले. चौकशी होईपर्यंत दोषी अधिकाºयाला निलंबित करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली.हे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले नसतानाही आता लगेच देखभालीची निविदा काढली कशी, असा सवाल नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला. त्यात उद्यान विभागाने किती कामांचे बिल अदा केले, असा सवाल करून मुल्ला यांनी अधिकाºयांना बोलावले. त्यावर उद्यान विभागाचे अधिकारी केदार पाटील यांनी बॉलिवूड पार्क आणि थीम पार्कचे उद्यान विभागाकडे ३६ लाखांचे बिल सादर झाले होते. परंतु, त्याची तपासणी केली असता ते केवळ दोन लाख ५० हजारांचेच असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे ते अदा केले नसल्याचे स्पष्ट केले.या स्पष्टीकरणानंतर यात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित अधिकाºयांवर कारवाईची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. त्यानुसार, याची चौकशीसाठी उपरोक्तसमिती नेमून चौकशी करून दोषी अधिकाºयांना निलंबित करावे, आतापर्यंत ठेकेदाराला जेवढी बिले अदा केली असतील, ती संबंधित अधिकाºयांच्या पगारातून कापून घ्यावीत, असा ठराव यावेळी नरेश म्हस्के यांनी सभागृहासमोर मांडला. त्यांच्या ठरावाला विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी अनुमोदन दिले.खर्च वसूल करणारथीम पार्कमधील भ्रष्टाचाराचा विषय सभागृहात गाजल्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी तसेच त्यांच्याकडून झालेला खर्च वसूल करावा, असे आदेशही त्यांनी दिले.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारthaneठाणे