शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पालिकेत स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीमध्ये भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:46 IST

शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

भिवंडी : महापालिका क्षेत्रात एमएमआरडीएच्या निधीतून सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधली आहेत. याच्या देखभाल दुरूस्तीसाठी पालिकेने ही स्वच्छतागृहे सामाजिक संस्थांना दिली आहेत. याबाबत या संस्थांनी पालिकेशी करार केला आहे. परंतु पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकारी व अभियंत्यांनी केवळ नगरसेवकांना खूष करण्यासाठी लाखो रूपये घेतले आहेत. त्यामुळे अशा भ्रष्ट कारभाराची नगरविकास सचिवांनी सखोल चौकशी करावी,अशी मागणी शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी केली आहे.केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिकेस ५० कोटी पैकी ३४ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यातून शहर स्वच्छता व स्वच्छतागृह दुरूस्तीच्या नावावर खर्च केला जात आहे. पालिका कार्यक्षेत्रात एकूण ४०६ स्वच्छतागृह असून यामध्ये २१६ एमएमआरडीए तर पालिका प्रशासनाचे १०५ स्वच्छतागृहे आहेत. त्यापैकी ६२ बांधा,वापरा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर सुरू आहेत आणि २३ पे अ‍ॅन्ड यूज या खासगी तत्त्वावर सामाजिक संस्थेला करार करून दिली आहेत.स्वच्छतागृहाची निगा व बांधकाम दुरूस्ती संबंधित संस्था व कंत्राटदाराने करायची आहेत असे करारात स्पष्ट नमूद आहे. मात्र पालिकेच्या बांधकाम व आरोग्य विभागाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी सरकारी नियमांना तिलांजली देत सुमारे ७५ स्वच्छतागृहांवर दोन वर्षात सुमारे दोन कोटीहून अधिक खर्च केल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. प्रशासनाने ४०६ स्वच्छतागृहांपैकी १४० जणांचे करारनामे असून इतरांचे करार गहाळ झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात बांधण्यात आलेली स्वच्छतागृहे आयुक्तांच्या आदेशानुसार दुरूस्त केली जात आहेत. ही दुरूस्ती पालिकेच्या बांधकाम विभाग व आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. करारनामे सांभाळून ठेवणे आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे या बाबत अधिक माहिती देता येणार नाही. —दिलीप माळी, स्वच्छतागृह विभाग प्रमुख अधिकारी

टॅग्स :bhiwandiभिवंडीCorruptionभ्रष्टाचारShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस