शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम तलावात केला भ्रष्टाचार - भाजपाचा आरोप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:29 IST

मागील दीड ते दोन वर्षात कुळगाव बदलापूर नगरपालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. भुयारी गटार योजना असो की गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव उभारणे. प्रत्येक कामात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. आता, तर भ्रष्टाचार करणाºयांनी हद्द्च केली आहे.

बदलापूर : मागील दीड ते दोन वर्षात कुळगाव बदलापूर नगरपालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. भुयारी गटार योजना असो की गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव उभारणे. प्रत्येक कामात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. आता, तर भ्रष्टाचार करणाºयांनी हद्द्च केली आहे. त्यांनी भ्रष्टाचाराकरिता देवालाही सोडलेले नाही असा गंभीर आरोप भाजप शहर अध्यक्ष व नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे.बदलापूर नगरपालिकेने नगरपालिका हद्दीत एकूण तीन कृत्रिम तलाव उभारले. त्यानुसार उल्हास नदीवरील कृत्रिम तलावासाठी चार लाख ९९ हजार, शिरगाव व वडाई गार्डन येथील कृत्रिम तलावासाठी प्रत्येकी दोन लाख ९९ हजार खर्चाच्या निविदा मंजूर केल्या. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून भ्रष्टाचार करणाºयांनी देवालाही सोडत नाही? असा आरोप शिंदे यांनी केला. प्रभाग क्र मांंक ३० मध्ये सूर्यविहार सोसायटी येथे स्वखर्चाने कृत्रिम तलाव उभारले. त्याकरिता केवळ दोन हजार रु पये इतका खर्च आला तर पालिकेने कृत्रिम तलावाची निविदा ही ९.९ टक्के वाढीव दराने मंजूर केली. पालिका प्रशासनाकडून कंत्राटदारावर लाखोंची मेहेरबानी का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.प्रत्येक वर्षी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभरण्यात येतात. त्या तलाव निर्मितीसाठी वापरलेले जाणारे साहित्य ताडपत्री, रेती , सिमेंटच्या गोण्या कुठे जातात. जर आपण कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याºया कंत्राटदारास या कृत्रिम तलावांचे बिल दिले असेल तर हे साहित्य नगरपालिकेची मालमत्ता आहे. मग हे साहित्य गेले कुठे? याचाही खुलासा प्रशासनाने करावा अशी मागणी शिंदे यांनी केली. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय कंत्राटदारास रक्कम देऊ नये अशी भाजपाची मागणी असल्याचेही त्यांनीसांगितले.नगरसेवक सुरवळांचे जातीने लक्षतीन तलावांपैकी नगरसेवक अरूण सुरवळ यांच्या प्रभागात असलेल्या कृत्रिम तलावाची परिस्थिती व सुविधा चांगल्या होत्या.त्यामुळे या प्रभागातील गणेश भक्तांना कोणताही त्रास झाला नाही.परंतु त्याचे श्रेय हे पालिकेचे नसून ते व्यक्तिश: सुरवळ यांचे आहे. त्याठिकाणी सुरवळ यांनी स्वत: लक्ष दिल्याने ते शक्य झाले, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.