शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नगरसेवक होणार श्रीमंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:54 IST

महापौर, उपमहापौरासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच कोटी, प्रभाग समिती सभापतींना एक कोटी, तर नगरसेवकांना ३० लाखांच्या निधीची तरतूद

- सदानंद नाईक । लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापौर, उपमहापौरासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच कोटी, प्रभाग समिती सभापतींना एक कोटी, तर नगरसेवकांना ३० लाखांच्या निधीची तरतूद उल्हासनगरच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही दरवाढ नसेल आणि तो ७१८ कोटींचा असेल, हे स्थायी समितीत आधीच स्पष्ट झाले होते. निवडणुकीमुळे लांबलेल्या उल्हासनगरच्या अर्थसंकल्पात करवसुलीवर भर देण्याचे आणि मालमत्ता कराचे उत्पन्न वाढवण्याचे संकेत आधीच देण्यात आले आहेत. उल्हासनगरची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यात थकबाकी वसुलीवर भर दिला जाणार असल्याने थकबाकीधारकांचे समर्थक असलेले नगरसेवक अस्वस्थ आहेत. त्यातच महापौरांसह वेगवेगळ््या पदाधिकाऱ्यांनी निधीचा मोठा वाटा आपल्याकडे वळवल्याची तरतूद करून घेतली असेल, तर पालिकेचा कारभार कसा चालवायचा असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विकासासाठी, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पैसे द्यायचे की पदाधिकाऱ्यांवर निधीची खैरात करायची असा प्रश्न महासभेत उपस्थित होण्याची शक्यता आहे. पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी गेल्या महिन्यात स्थायी समिती सभापती कांचन लुंड यांना हा अर्थसंकल्प सादर केला होता. आयुक्तांनी मालमत्ता करातून १८१ कोटी, पाणीपट्टीतून ४१ कोटींची वसुली गृहीत धरली होती; तर लुंड यांनी मालमत्ता करातून २३५ कोटी, पाणीपट्टीतून ५६ कोटी मिळवावे, अशी सुधारणा सुचवल्याची चर्चा असल्याने येत्या सहा महिन्यात थकबाकीधारकांची दाणादाण उडण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाची झोप उडणार आहे.- या प्रस्तावांना पदाधिकारी, नगरसेवकांनी विरोध करू नये, म्हणून त्यांना निधीवाढीचे मधाचे बोट लावल्याची चर्चा आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या भवनासाठी निधीची तरतूद या अर्थसंकल्पात असेल असे मानले जाते. यामुळे महासभेकडे लक्ष लागले आहे.