शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

उशिराने अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत असल्याने नगरसेवकांनी जाहीर केली नाराजी, कामे कधी करायची, संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 16:27 IST

अर्थसंकल्प मंजुरीला सप्टेंबरचा महिना उजाडणार असेल तर प्रभागातील कामे कधी करायची असा सवाल उपस्थित करीत महासभेत राष्टÑवादी आणि भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्देमिनिट्सही वेळेत मिळत नाहीतबजटेचे प्रस्ताव केव्हा होणार तयार

ठाणे - मागील वर्षी प्रमाणेच यंदा सुध्दा महापालिकेचा अर्थसंकल्प उशिराने मंजुर झाल्याने निविदा कधी निघणार कामे कधी करणार असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादी  आणि भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला कात्रीत धरले. आता मंजुरी मिळाली असेल तर कामे सुरु होण्यास पुन्हा फेब्रुवारीचा महिना उजाडणार आहे. त्यामुळे पुन्हा निधी स्पील ओव्हरमध्ये जाणार असल्यानेही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी आताच चोख पावले उचलण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.                    ठाणे महापालिकेचे २०१७-१८ चे ३०४७.१९ कोंटीचे सुधारीत आणि २०१८-१९ चे ३६९५.१३ कोटींचे मुळ अंदाजपत्रक आयुक्त संजीव जयस्वाल मार्च महिन्यात महासभेला सादर केले होते. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महासभेत यावर रात्रभर चर्चा रंगली होती. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अंदाजपत्रकावर एकमत होत ३४४.१३ कोटींची वाढ सुचविण्यात येऊन ते मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे आता २०१८-१९ चे अंदाजपत्रक हे आता ४०३९.२६ कोटींवर गेले आहे.                                 परंतु अर्थसंकल्प केव्हा मंजुर झाला असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी उपस्थित केला. त्यावर लेखा व वित्त अधिकाऱ्यानी ३ एप्रिल २०१८ ला अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्याची दिली. प्रशासनाकडून आलेल्या या उत्तरानंतर सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. मग त्याची अंमलबजावणी केव्हा होणार असा सवाल भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी केला. अर्थसंकल्प जर मंजुर झाला असेल तर त्याची चर्चा कुठे झाली, कोणत्या कामांचा समावेश करण्यात आला, याची माहिती देण्याची मागणी मिलिंद पाटणकर यांनी केली. आता जो अर्थसंकल्प मंजुर झालेला आहे, त्यात नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश झाला आहे का? नसेल तर मग दोन दोन दिवस चर्चा करणे काय उपयोगाचे असा सवाल नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. अमंलबजावणीच जर उशिराने होत असेल तर नगरसेवकांची कामे केव्हा होणार, आता बजेट मंजुर झाले तर त्याचे प्रस्ताव केव्हा तयार होणार, त्यावर बजेट केव्हा पडणार, स्थायी आणि महासभेची मंजुरी, पुन्हा निविदा, स्फुटणी कमिटी या फेºयातून निघतांना फेब्रुवारी महिना उजाडणार असेल तर पुन्हा निधी स्पील ओव्हरमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा प्रश्न जगदाळे यांनी उपस्थित केला. यावर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सारवासारव करीत, नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी वाढवून मिळावा, काही कामांचे नव्याने नियोजन करणे, या सर्वांवर चर्चा करुनच हा अर्थसंकल्प मंजुर होण्यास विलंब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनीसुध्दा नगरसेवकांच्याच कामांसाठी आणि त्यांनी सुचिवलेल्या कामांचा जास्तीत जास्त अंतर्भाव कसा करता येऊ शकतो, यासाठीच अर्थसंकल्पाची अंमलबजावणी उशिराने झाल्याचे स्पष्ट केले.चौकट - महासभेचे मिनिट्स हे प्रत्येक महिन्याला मिळणे अपेक्षित आहे. न्यायालयाने सुध्दा त्याबाबत निर्णय दिला आहे. परंतु असे असतांना सुध्दा सहा सहा महिने मिनिट्स उशिराने मिळत असल्यानेच हे सर्व प्रकार घडत असल्याचा मुद्दा नगरसेवक संदीप लेले यांनी उपस्थित केला. त्यामुळे यापुढे किमान मिनिट्स तरी वेळेत मिळावेत अशी आशा नगरसेवकांनी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाBudgetअर्थसंकल्प