शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

निधीकपातीमुळे नगरसेवक धास्तावले

By admin | Updated: February 16, 2017 01:56 IST

मीरा-भार्इंदर पालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवक निधी १० कोटींनी कमी करून तो केवळ पाच कोटी केला आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवक निधी १० कोटींनी कमी करून तो केवळ पाच कोटी केला आहे. तर, प्रभागनिधीचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. आॅगस्टमध्ये निवडणूक होणार असून त्यात नगरसेवक निधीत कपात केल्याने धास्तावून गेले आहेत. मात्र, विकासासाठी स्थायी समिती अंदाजपत्रक व प्रभाग निधीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले असून बुधवारपासून त्यावर चर्चा सुरू झाली आहे. स्थायीमध्ये मान्य झाल्यावर ते महासभेत मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात प्रशासनाने ४५८ कोटी ३२ लाखांचे मूळ उत्पन्न असलेले अंदाजपत्रक स्थायीला सादर केले. प्रशासनाने त्यात २४९ कोटी २४ लाखांच्या कर्जासह ५९ कोटी १० लाखांच्या सरकारी अनुदानाची भर घातली आहे. त्यामुळे पुढील वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासनाने गेल्या वर्षीपेक्षा ५३ कोटींनी वाढवून १ हजार ४४२ कोटींवर आणले. त्यात नगरसेवक निधीसाठी ५ कोटींची तरतूद केली असून प्रभाग निधीला मात्र अंदाजपत्रकातून डच्चू देण्यात आला आहे. गेल्या वर्षी मात्र नगरसेवक व प्रभाग निधीसाठी प्रत्येकी सुमारे १५ कोटींची तरतूद केली होती. यंदा नगरसेवक निधी १० कोटींनी कमी करत प्रभाग निधीसाठी कोणतीही तरतूद नाही. यंदाच्या निवडणुकीसाठी एका प्रभागातून चार जणांचे पॅनल असेल. या अगोदर प्रभागरचना जाहीर होेणार आहे. नगरसेवक निधीला कात्री लावल्याने नगरसेवकांना काटकसरीने विकास करावा लागण्याची शक्यता आहे. सध्या नगरसेवक व प्रभागांना अनुक्रमे १५ व १० लाखांचा वार्षिक निधी मिळतो. प्रभाग निधीसाठी गेल्या वेळेप्रमाणेच १५ कोटींची तरतूद केली जाण्याची शक्यता असली, तरी त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)