शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंच्या निर्णयापूर्वीच राजीनामा झाला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:44 IST

केडीएमसीच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ दिलेला नगरसेवकपदाचाा राजीनामा आयुक्त पी. वेलरासू यांना दिल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पुन्हा केला

कल्याण : केडीएमसीच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ दिलेला नगरसेवकपदाचाा राजीनामा आयुक्त पी. वेलरासू यांना दिल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पुन्हा केला. पालिकेच्या नागरी सुविधा केंद्राने राजीनामा स्वीकारल्याची प्रत त्यांनी दाखवली. पण हा राजीनामा बुधवारीही मिळाला नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्त कार्यालयाने दिल्याने म्हात्रेंच्या राजीनाम्याचे गूढ वाढले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे या राजीनाम्यावर निर्णय घेणार असताना तो बेपत्ता होण्याचे गूढ वाढले आहे.म्हात्रे यांनी सोमवारी महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी. वेलरासू यांना हा राजीनामा पाठविला. तो आयुक्तच नव्हे, तर महापौरांनीही राजीनामा मिळाला नसल्याचे सांगितले. यावर म्हात्रेंनी महापौरांच्या दप्तरी राजीनामा जमा झाला असून, ते खोटे बोलत असल्याचा आरोप केला. आयुक्तांनाही राजीनामा दिल्याचा दावा त्यांनी बुधवारी पुन्हा केला.फेरीवाला अतिक्रमण, पाणीचोरी, अन्यायकारक वसुली, अधिकाºयांची लाचखोरी, टॉवर आणि इमारती यांना कर लावण्यात होत असलेली टाळाटाळ यामध्ये महापालिकेचे कोटयावधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत म्हात्रेंनी राजीनामा दिला आहे.शिवसेनेत सारे गप्पम्हात्रे यांचा राजीनामा ही शिवसेनेसाठी नामुष्कीची बाब असली तरी त्यावर शिंदे निर्णय घेईपर्यंत कोणी बोलण्यास तयार नाही. यासंदर्भात केडीएमसीतील शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. वामन म्हात्रे हे त्यांच्या कामाच्या वेगळ््या पद्धतीबद्दल प्रसिद्ध असल्याने शिवसेनेतील अनेक नेते त्याबद्दल काही बोलण्यास तयार नाहीत.