शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविका घोलप यांनी राजीनामा द्यावा

By admin | Updated: July 3, 2017 06:11 IST

सफाई कर्मचाऱ्यांनी लावलेल्या होर्डिंग्जवरील छायाचित्रांमध्ये त्या व्यक्तींनी दागदागिने घातल्याचे दिसल्याने माजी महापौर व शिवसेनेच्या

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : सफाई कर्मचाऱ्यांनी लावलेल्या होर्डिंग्जवरील छायाचित्रांमध्ये त्या व्यक्तींनी दागदागिने घातल्याचे दिसल्याने माजी महापौर व शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका वैजयंती घोलप यांनी आक्षेप घेत वक्तव्ये केली होती. कोणीही कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नये. त्यामुळे घोलप यांच्या नगरसेवकपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी रेखा गोपाळ बहनवाल यांनी केली आहे.बहनवाल यांनी शनिवारी केडीएमसी मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची भेट घेत ही मागणी केली. सफाई कामगार अजय जानू सावंत या सफाई कामागाराच्या अंगावरील दागदागिन्यांबद्दल घोलप यांनी आक्षेप घेत वक्तव्य केली होती. अजय यांची आई बांधकाम व्यावसायिक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे संपत्ती असू शकते. त्यातच, अजय हे मे महिन्यापासून वैद्यकीय रजेवर होते, असे त्यांनी घरत यांना सांगितले. त्यावर घरत म्हणाले, सध्या आयुक्त वेलरासू प्रशिक्षणासाठी मसुरीला आहेत. त्यामुळे घोलप यांच्या व्यक्तव्याबाबत चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. रेनकोट, गमबूट आणि मास्कअभावी सफाई कर्मचाऱ्यांना काम करण्यात अडचणी येतात. या साहित्यासाठी दोन वर्षे वर्षे प्रतीक्षा करावी लागते, हे योग्य नाही. या कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहिले, तर ते स्वच्छता ठेवतील. त्यातही मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांना मिळणारे साहित्यही हीन दर्जाचे आहे, ही बाब गंभीर आहे, असे बहनवाल म्हणाल्या. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.आठ हजार सफाई कर्मचारी हवेतकेडीएमसी हद्दीतील लोकसंख्येनुसार आठ हजार सफाई कर्मचारी हवेत. पण, अवघे दोन हजार २७२ कर्मचारी आहेत. २७ गावांमध्ये ७९९ कर्मचारी आहेत. त्यात सफाई आणि काही कार्यालयीन कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळावे, पाच लाखांचा आरोग्य विमा मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. कर्मचाऱ्यांना सध्या दोन गणवेश मिळतात. त्याचे तीन व्हावेत आणि सार्वजनिक सुट्या मिळाव्यात, या मुद्यावरही त्यांनी चर्चा केली.सफाई कर्मचाऱ्यांसंदर्भातील वक्तव्याला नाहक जातीपातीचा रंग दिला जात आहे. मी केवळ उदाहरण म्हणून त्यासंदर्भात नाव घेऊन बोलले. त्या वेळी माझ्यासह अन्य नगरसेवकांनीही कोणाचेही नाव न घेता माझ्या म्हणण्यात तथ्य असल्याचे म्हटले. जे मी बोलले ते बोललेच, पण त्यामुळे जे होईल त्याला मी सामोरे जाईनच.- वैजयंती घोलप-गुजर, ज्येष्ठ नगरसेविका, शिवसेना