शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे कंत्राटी डॉक्टर पगारापासून वंचित

By admin | Updated: December 16, 2015 00:28 IST

अंबरनाथ नगरपरिषदेच्या छाया रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी सेवा देण्याचे काम बंद केले आहे. रुग्णालयात डॉक्टरांची

- पंकज पाटील,  अंबरनाथअंबरनाथ नगरपरिषदेच्या छाया रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी सेवा देण्याचे काम बंद केले आहे. रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.१९७८ मध्ये अंबरनाथ नगरपरिषदेने ६२ खाटांचे डॉ.बी.जी.छाया नावाने रुग्णालय सुरु केले होते. रुग्णालय सेवा देणारी राज्यातील पहिली नगरपरिषद म्हणून अंबरनाथचे नाव गौरविण्यात येत होते. सर्वात चांगली सेवा म्हणून छाया रुग्णालयाची ओळख होती. मात्र आज ही परिस्थिती बदलली आहे. सेवेचे तर सोडाच परंतु, प्राथमिक उपचार देण्यातही हे रुग्णालय कमी पडत आहे. ज्यावेळी रुग्णालय सुरु झालेले त्यावेळेस शस्त्रक्रीया विभाग, एक्स रे मशिन आणि सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध होती. मात्र आज पालिकेचे केवळ तीन डॉक्टरच संपूर्ण रुग्णालय हाताळत आहेत. रुग्णांचा वाढता ओघ लक्षात घेऊन येथे डॉक्टर घेण्याची गरज होती. नविन डॉक्टरांची नेमणूक होईपर्यंत येथे कंत्राटी डॉक्टरांची भरती केली होती. त्यानुसार ठोक पगारावर ८ कंत्राटी डॉक्टरांची नेमणूक येथे केली होती. या डॉक्टरांना महिन्याला नियमित पगार देणे पालिकेला बंधनकारक होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे पगारच दिलेले नाहीत. त्यामुळे ८ पैकी ४ डॉक्टरांनी आपली सेवा बंद केली आहे. डॉक्टरांनी अचानक हे पाऊल उचलल्याने त्याचा ताण रुग्णालयावर पडला आहे. दररोज ४०० हुन अधिक रुग्ण बाह्य रुग्णसेवेचा लाभ घेत असतात. आता डॉक्टरांची कमतरता पडल्याने त्यांचे हाल होत आहेत. अल्प दरात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे पगार न देण्याचे काम पालिकेने करुन नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळण्याचे काम केले आहे. ‘ डॉक्टरांना पगार मिळालेले नाही कळताच ते लागलीच काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यापुढे अशी चुक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. या रुग्णालयात नविन डॉक्टर्सची मागणी शासनाकडे केली आहे. - गणेश देशमुख, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद