शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

Coronavirus Updates: वाढत्या रुग्णांमुळे बेड होऊ लागले कमी; ठाणे महापालिका हद्दीतील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 00:22 IST

अवघे १,२७४ बेड शिल्लक, या शिल्लक बेडमध्ये विलगीकरणाचे ८४, ऑक्सिजनचे २५७, आयसीयूचे ६१ आणि व्हेंटिलेटरचे २१ बेड शिल्लक असल्याची माहिती मनपाने दिली.

ठाणे : ठाणे मनपा हद्दीत काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या चार ते पाचपटीने वाढत आहे. त्यामुळे मनपा हद्दीतील कोविड सेंटरमधील बेडची संख्याही कमी होत आहे. मनपा हद्दीत सध्या सहा हजार १२७ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून त्यातील बहुसंख्य रुग्ण हे घरी उपचार घेत असल्याने रुग्णालयातील एक हजार ३५० बेड फुल झाले आहेत. तर सध्या एक हजार २७४ बेड शिल्लक आहेत. त्यातील ६०० बेड हे भाईंदरपाडा येथील विलगीकरण कक्षातील आहेत, तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांतील बेड मात्र फुल होऊ लागले आहेत.

रुग्ण वाढत असल्याने मनपाने ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. सध्या दररोज ७०० ते ८०० रुग्ण आढळत आहेत. सध्या प्रत्यक्षात सहा हजार १२७ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. यातील एक हजार ३५० रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यामुळे दोन हजार ६०२ बेडपैकी एक हजार २७४ बेड आजही रिकामे असल्याचा दावा मनपाने केला आहे; परंतु दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालयांतील तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील बेडही आता रिकामे नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

महापालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये विलगीकरणाचे २२१, ऑक्सिजनचे १३, आयसीयूचे ७७ आणि व्हेंटिलेटरचे १०० बेड शिल्लक असल्याची माहिती पालिकेने दिली. दुसरीकडे १६ खासगी रुग्णालयांत एकूण ९१० बेड असून त्यातील ३४१ बेड सध्या शिल्लक आहेत. उर्वरित ५६९ बेड फुल झाले आहेत. त्यातही शहरातील काही नामांकित खासगी रुग्णालयात बेडही शिल्लक नाहीत. त्यामुळे येथे उपचारासाठी रुग्ण वेटिंगवर असल्याची माहितीही मनपा सूत्रांनी दिली. या शिल्लक बेडमध्ये विलगीकरणाचे ८४, ऑक्सिजनचे २५७, आयसीयूचे ६१ आणि व्हेंटिलेटरचे २१ बेड शिल्लक असल्याची माहिती मनपाने दिली.

...तर तीन ते चार दिवसांत बेड फुल कोरोनाबाधितांपैकी घरी उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण हे जास्त असल्याने रुग्णालयात सध्या काही प्रमाणात बेड शिल्लक असल्याचे दिसत आहे; परंतु रुग्णवाढीचा हा दर असाच राहिला तर तीन ते चार दिवसांत बेड फुल होतील, असे दिसत आहे.

विलगीकरण कक्षात ६०० बेड रिकामे ठामपाने भाईंदर पाडा येथे विलगीकरण केंद्र पुन्हा सुरू केले आहे. तेथे लक्षणे नसलेल्यांना ठेवले जात आहे. त्यानुसार येथील ६७५ पैकी ७५ बेड फुल झाले असून ६०० बेड शिल्लक असल्याची माहिती मनपाने दिली.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या