शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus कल्याणमधील दोन सोसायटी होम क्वारंटाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 06:37 IST

एकाच कुटुंबात तीन कोरोना रुग्ण। परिसरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद

- सचिन सागरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : एकाच कुटुंबात तीन कोरोना रुग्ण आढळल्याने चिकणघर परिसरातील दोन सोसायटी शनिवारपासून पूर्णत: बंद केल्या आहेत. त्यामुळे या दोन सोसायट्यांमधील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा झालेला नाही. निर्बंध घातलेल्या परिसरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद केली आहेत.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. डोंबिवलीत अत्यावश्यक सेवेतील वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहने चालविण्यास बंदी आहे. त्यानंतर, शुक्रवारपासून कल्याणमध्येही खासगी वाहनांवर बंदी घालण्यात आली. शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या २४ वर जाऊन पोहोचली. यात पश्चिमेतील चिकणघर परिसरात असलेल्या एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या तिघांचा समावेश आहे. त्यामुळे, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि केडीएमसीने या सोसायटीसह त्याच्या शेजारील अन्य एक सोसायटी शनिवारी सकाळी सील केली. या दोन्ही सोसायटींमधील रहिवाशांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. या दोन्ही सोसायटींमध्ये दोनशे कुटुंबे राहतात. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे, दोन्ही सोसायटींचा परिसर निर्जंतुकीकरण केला, अशी माहिती रहिवाशांनी दिली. ज्या इमारतीमध्ये हे रुग्ण राहायला आहेत तेथील रहिवाशांना बाहेर न पडण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. जर सोसायटीच्या बाहेर दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी उद्घोषणाही करण्यात आली आहे.

सुरक्षारक्षक वस्तू पोहोचवणारजीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असल्यास सोसायटीच्या सचिवाला याबाबतची माहिती द्यायची आहे. त्यानंतर, या वस्तू सुरक्षारक्षकामार्फत संबंधित रहिवाशांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती रहिवासी चारुदत्त बोरोले यांनी दिली.