शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनावरील उपाययोजनेच्या बैठकीतही राजकीय हेवेदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:14 IST

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेत बोलावण्यात आलेल्या सभेत कोरोनावर चर्चा कमी आणि राजकीय हेवेदाव्यांवर चर्चा रंगली.

अंबरनाथ : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात नवीन उपाययोजना आखण्यासाठी मंगळवारी पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती. या सभेत कोरोनावर चर्चा कमी आणि राजकीय हेवेदाव्यांवर चर्चा रंगली. त्यामुळे ही सभा गुंडाळण्याची वेळ आली आणि कोरोनाच्या बाबतीत करायच्या उपाययोजना या बाजूला राहिल्या. अंबरनाथ नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा पालिकेत बोलावण्यात आली होती. या सभेला नगरसेवकही उपस्थित होते. या सभेत मुख्याधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोनावर माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र, माहिती देत असतानाच उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी मध्येच शहरातील सफाई कामगारांचा विषय घेतला. आपत्कालीन परिस्थितीत समीक्षा कंपनीच्या माध्यमातून कामगार घेत असताना अस्तित्वातील घंटागाडीवरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. या कामगारांना सुरक्षेची साधने पुरवली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला, तसेच योग्य मोबदलाही दिला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समीक्षा कंपनीच्या ठेक्यावर चर्चा सुरू असतानाच नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी शेख यांना थांबवत ही सभा कोरोनावरील उपाययोजनेवर असल्याची जाणीव त्यांना करून दिली. तरीही शेख याच विषयावर चर्चा करत राहिल्याने नगराध्यक्षांनी ही सभा आटोपण्याचा निर्णय घेतला. विषयांतर केले जात असल्याने कोणाच्या कोरोनासंदर्भातील सूचना असल्यास त्यांनी त्या सूचना द्याव्या, असे स्पष्ट केले. त्यावर सूचना येत नसल्याने त्वरित राष्ट्रगीत घेण्यात आले. राष्ट्रगीताला उभे राहिल्यानंतर तीन ते चार नगरसेवकांनी घाईघाईत आपल्या सूचना सभागृहात मांडल्या. त्यानंतर ही सभा गुंडाळण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांना वेळच मिळाला नाही. मुख्याधिकाºयांना कोरोना आणि त्याच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी योग्य वेळही दिला नाही. त्यामुळे राजकीय वादाचा फटका हा कोरोनाच्या बैठकीला बसला आहे.  

टॅग्स :ambernathअंबरनाथCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस