शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी जाणवतोय लाकडांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 01:27 IST

कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी दुर्गम भागातील या गावाच्या जवळपास लाकडे उपलब्ध नसल्याने वाडा तालुक्यातून लाकडे मागवावी लागत आहेत.

- राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यातील रिवेरा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे समर्पित कोरोना रुग्णालय असून या ठिकाणी ७२ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी दुर्गम भागातील या गावाच्या जवळपास लाकडे उपलब्ध नसल्याने वाडा तालुक्यातून लाकडे मागवावी लागत आहेत.विक्रमगडपासून सुमारे पाच ते सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हाताणे गावात रिवेरा रुग्णालय आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये साडेतीन लाख रुपये खर्चून गावातील निर्जन ठिकाणी तातडीने स्मशानभूमी बांधण्यात आली.कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर रुग्णालयाच्या जवळच अंत्यसस्कार करण्याचे व त्याकरिता लाकडे स्थानिक स्वराज्य संस्थेने देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे प्रत्येक मृतासाठी पाचशे-साडेपाचशे किलो लाकडाचा खर्च या ग्रामपंचायतीला सोसावा लागत आहे. यासाठी विक्रमगड येथून किंवा वन विभागाकडून लाकडे मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने सुमारे २५ किलोमीटर दूरवर असणाºया वाडा येथून अंत्यविधीसाठी लाकडे आणावी लागत आहेत. ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नातून सव्वा दोन लाख रुपये म्हणजेच सुमारे २५ टक्क्यांहून अधिक उत्पन्न यासाठी खर्च झाल्याने गावातील लघु नळपाणी योजना व इतर विकासकामांना खीळ बसणार आहे. यामुळे येथील मंडळींनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. त्यांच्या सूचनेनुसार तालुका आपत्कालीन निधीमधून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या