शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मुंबईत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या केडीएमसीत येण्यावर निर्बंध; आयुक्तांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 01:07 IST

शुक्रवारपासून होणार अंमलबजावणी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा २००पार गेला आहे. या रुग्णांमध्ये सर्वाधित रुग्ण हे मुंबईत जाणारे अत्यावश्यक सेवेतील सरकारी आणि खासगी कर्मचारी आहेत. त्यामुळे ८ मेपासून या कर्मचाºयांना मुंबईतून कल्याण-डोंबिवली शहरात येण्या-जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

सरकारी व खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, तंत्रज्ञ यांच्यासह पोलीस, औषधनिर्माण कंपन्यांतील कामगार मोठ्या संख्येने कल्याण-डोंबिवलीत राहतात. लॉकडाउन लागू झाल्यापासून हे कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यासाठी त्यांना मुंबईत जावे लागते. तेथे यातील कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. या कर्मचाºयांची त्यांच्या कुटुंबासह मुंबईत राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जावी. तसेच, त्यांच्यासाठी कोरोना रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सरकारकडे केली होती. या मागण्यांची दखल घेत सरकारी व खाजगी रुग्णालयात काम करणाºयांची व्यवस्था मुंबईत जवळच्या हॉटेलमध्ये मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. तसेच, खासगी कंपन्या, बँकांत काम करणाºया कर्मचाºयांनी त्यांची व्यवस्था ते काम करत असलेल्या आस्थापनेच्या नजीक स्वत: करायची आहे.माहिती पाठवण्याचे आवाहननाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, आधारकार्ड नंबर नमूद करून ही माहिती सरकारी सेवेतील कर्मचाºयांनी kdmc.covid19.gov@gmail.com  या ईमेलवर तर खासगी कर्मचाºयांनी kdmc.covid19.pvt@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन केले आहे.उल्हासनगरातही प्रतिबंधमुंबईत सरकारी आणि खासगी कार्यालयात जाणाºया कर्मचाºयांना ८ मेपासून शहरात ये-जा करण्यास प्रतिबंध घातले आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे. मुंबई पालिकेत काम करणाºया कर्मचाºयांची निवासाची व्यवस्था पालिकेतर्फे हॉटेलमध्ये केली जाणार असून, खासगी कार्यालयात काम करणाºयांनी त्यांची निवासाची व्यवस्था स्वत: करावी, असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या