शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ‘त्या’ रुग्णाच्या वाटेतील ‘अडथळे’ दूर, कोरोनाच्या भीतीने अडविली होती वाट    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 01:50 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दखल घेतल्याने गावडे यांचा मार्ग मोकळा झाला. शिवाय, संबंधितांना कळवा पोलिसांनी योग्य ती समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ​​​​​​​

ठाणे : कोरोनाला घाबरू नका; पण जागरूक राहा, असे वारंवार प्रशासनाकडून आवाहन केले जात असले तरी काही ठिकाणी याचा अतिरेकही होत आहे. कळव्यातून वर्तकनगर येथे डायलिसिससाठी जाणाऱ्या राजेश गावडे (४०) यांचा रुग्णालयात जाण्याचा रस्ताच काही स्थानिक रहिवाशांनी नाहक अडविला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दखल घेतल्याने गावडे यांचा मार्ग मोकळा झाला. शिवाय, संबंधितांना कळवा पोलिसांनी योग्य ती समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबईतील एक कोरोनाग्रस्त पोलीस जमादार कळव्यातील ‘गुरुकृपा’ बिल्डिंगमध्ये वास्तव्याला आहे. त्यांना २० एप्रिल रोजी उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले. त्यांची पत्नी आणि मुलीला भार्इंदरपाडा येथे विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. या इमारतीच्या संपूर्ण परिसराचे ठाणे महापालिकेने निर्जंतुकीकरण केले आहे. इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार मात्र सील केले आहे. या इमारतीमध्ये अत्यावश्यक सेवेचा पुरवठा स्थानिक नगरसेवक मुकुंद केणी आणि ठामपा कळवा प्रभाग समितीमार्फतीने केला जातो. याच इमारतीमधील निवृत्त पोलीस अधिकाºयाचे चिरंजीव राजेश हे किडणीच्या आजाराने ग्रस्त असून त्यांना वर्तकनगर येथे डायलिसिससाठी नियमित जावे लागते. इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने अन्य छोट्या मार्गाने सोमवारी ते डायलिसिससाठी गेले. मात्र, परतल्यानंतर त्यांचा इमारतीमध्ये जाण्याचा हाही मार्ग लाकडी बांबूने बंद करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी इमारतीला लांबचा वळसा मारून कम्पाउंड वॉल चढून द्राविडी प्राणायम करीत कसातरी प्रवेश मिळविला. आता पुढच्या वेळी डायलिसिसला कसे जायचे, या चिंतेने त्यांनी कळव्याच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.अन् मार्ग झाला मोकळापोलीस आयुक्त फणसळकर यांनी तक्रारीची तत्काळ दखल घेत कळवा पोलिसांना घटनास्थळी चौकशीसाठी पाठविले. तेव्हा गुरूकृपा इमारतीच्या बाजूला असलेल्या जय मातादी इमारतीमधील काही रहिवाशांनीच कोरोनाबाधित व्यक्ती त्या छोट्या मार्गाचा वापर करतील, असा समज करून तो मार्गच बंद केल्याचा दावा केला. राजेश यांचा भाऊ नितीन गावडे, सामाजिक कार्यकर्ते मंदार केणी यांच्यासमवेत पोलिसांनी सोमवारी रात्री बैठक घेऊन असा प्रकार यापुढे होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच गावडे यांचाही जाण्या-येण्याचा मार्ग मार्ग मोकळा झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणे