शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

CoronaVirus News: कोरोनाचा संसर्ग नसतानाही करावी लागतेय चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 01:45 IST

ठाण्यात आजच्या घडीला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजारांच्या आसपास पोहोचली आहे. त्यापैकी २,८३५ रुग्ण बरे झाले असून, २,७५२ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत.

ठाणे : कोरोनासारखी केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांचे ठाण्यात हाल सुरु आहेत. शहरातील अनेक खाजगी रुग्णालयांतील ओपीडीमध्ये त्यांना प्रथम कोरोनाची चाचणी करा मगच उपचारासाठी आमच्याकडे या, असा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे कोरोना नसतानाही नागरीकांना भूर्दंड सोसावा लागत आहे. याशिवाय अहवाल येईपर्यंत त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड होण्याचे प्रकारही घडत आहेत.ठाण्यात आजच्या घडीला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजारांच्या आसपास पोहोचली आहे. त्यापैकी २,८३५ रुग्ण बरे झाले असून, २,७५२ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. आतापर्यंत १८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनासमोरील डोकेदुखी वाढत आहे. रोज १00 हून अधिक कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यातील प्रत्येकाला कोरोनाचा संसर्ग झालाच आहे, असे नाही. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अनेक जण खाजगी लॅब, तसेच महापालिका, वाडीया दवाखाना येथे गर्दी करीत आहेत. एखाद्या रुग्णाला साधा सर्दी, ताप किंवा खोकला झाला असेल तरी खाजगी रुग्णालये त्याला आधी कोरोनाची चाचणी करा मगच आमच्याकडे उपचारासाठी या, असा सल्ला देत आहेत.ठाण्यात लहानमोठी ३४४ खाजगी रुग्णालये आहेत. यातील १७ रुग्णालये ही कोविड सेंटर आहेत. उर्वरित रुग्णालये ही इतर आजारांच्या रुग्णांसाठी ठेवण्यात आली आहेत. परंतु अशा रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी गेलेल्या रुग्णांना कोरोना नसतानाही चाचणी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडू लागली आहे. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून ही चाचणी करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.खबरदारीसाठी चाचणीएखाद्या रुग्णाला कोरोनासारखी लक्षणे असतील, तर खबरदारी म्हणून त्यांना चाचणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. इतरांना त्याची बाधा होऊ नये म्हणूनच हा सल्ला दिला जात असल्याची माहिती महापालिकेचे कोविड प्रमुख डॉ. आर.टी. केंद्रे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या