शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रस्त्यावरील मास्क धोकादायक; सॅनिटायझरच्या दर्जावरही शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:28 IST

अशा विक्रे त्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात रस्त्यावर, दुकानात, कार्यालय, बँकेतील वर्दळ वाढली आहे. बाजारपेठेतसुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीकरिता येत आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारपर्यंत कोरोनामुळे ४२ जणांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे आरोग्य विभागाची जबाबदारी वाढली आहे. रस्त्याच्या कडेला, सिग्नलवर स्वस्तात मास्क व सॅनिटायझरची विक्री केली जाते. या वस्तू आरोग्याच्या दृष्टीने किती योग्यतेच्या आहेत, हे पाहणे तितकेच गरजेचे झाले आहे.पनवेल परिसरातील रस्त्याच्या कडेला, चौकात, हातगाड्यांवर मास्क, सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. ३० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत रंगीबेरंगी मास्क विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर सॅनिटायझरच्या छोट्या बॉटलचीही विक्री केली जात आहे. मुंबई-पुणे महामार्ग तसेच अंतर्गत रस्ते, चौकातील सिग्नलवर मास्कचे फिरस्ती हातठेले पाहायला मिळत आहेत. उल्हासनगर, मुंबई येथून हे मास्क खरेदी करून पनवेल परिसरात रस्त्यावर विक्री केली जात आहे. रस्त्याच्या कडेला असलेले रंगीबेरंगी फॅन्सी मास्क नागरिकांना आकर्षित करतात. घेण्याकरता नागरिकांकडून प्रत्येक मास्कला स्पर्श केला जातो. त्याचबरोबर तोंडालाही लावून पाहिले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. कोरोना विकत घेण्यासारखे झाले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. स्वस्तातील मास्क मिळतात म्हणून त्याचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. पॅकबंद असलेले मास्क तसेच घरी तयार केलेल्या मास्कचा वापर करायला हवा. दर्जाहीन तसेच स्पर्श झालेल्या मास्कची विक्री केल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. लहान मुले, वृद्ध व्यक्तींना असे उत्पादन केलेले मास्क वापरणे धोकादायक ठरू शकते.विक्रेत्यांसाठी नियमावली गरजेचीरस्त्यावर विक्री करणारे हे सामान्य कुटुंबातील तसेच परप्रांतीय आहेत. मास्क खरेदीमुळे त्यांना दोन पैशांची मदत होणार आहे. मात्र मास्क उघड्यावर विकण्याऐवजी पाकिटात बंद असलेले मास्क तसेच योग्य काळजी घेऊन विक्री करण्याकरता महापालिकेने नियमावली तयार करणे गरजेचे आहे. पॉकीट बंद असल्याने स्पर्श टाळता येऊ शकतो. यामुळे रोजगारही मिळेल आणि नागरिकांना योग्य दर्जाचे मास्कही उपलब्ध होतील. यासाठी महापालिकेने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या