शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक येती दारा, तोची दिवाळी दसरा; हॉटेल व्यावसायिक सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:07 IST

कुठे गर्दी, तर कुठे शुकशुकाट

ठाणे : हॉटेल व्यावसायिकांनी सोमवारपासून व्यवसायाचा शुभारंभ केला. ‘ग्राहक येती दारा, तोची दिवाळी दसरा’ अशा शब्दांत स्वागत करीत काही हॉटेलबाहेर चक्क कंदीलही पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी मोजक्याच हॉटेलमध्ये गर्दी, तर बहुतांश ठिकाणी शुकशुकाट होता.व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये आधीच स्वच्छता करून घेतली होती. काही हॉटेलमध्ये डिस्पोजबल प्लेट्स, वाटी, चमचे, ग्लास वापरण्यात येत आहेत. काहींनी मेन्यूकार्ड बंद करून क्यूआर कोडवर आॅर्डर देण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांना वापरलेल्या प्लेट्स, वाटी, चमचे, ग्लास टाकण्यासाठी डिस्पोजेबल पिशवी दिली जात आहे. वेटर वाढायला न येता थेट किचनमधून थाळी घेऊन टेबलवर ठेवली जात असल्याचे हॉटेल व्यावसायिक सनी पावसकर यांनी सांगितले.घेतली जाणारी दक्षता : हॉटेलबाहेर सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी एक टेबल सोडून दुसऱ्या टेबलवर ग्राहकांना बसण्यास सांगितले जात आहे.वेटर हे मास्क आणि ग्लोव्हज घालून सेवा देत आहेत. ग्राहकांचे तापमान तपासले जात असून नाव, मोबाइल आणि किती वाजता आले, याच्या नोंदी घेत आहेत.दहा टक्केच हॉटेल उघडले... : संध्याकाळी होत असलेला खरा व्यवसाय करण्यास परवानगी नसल्याने ठाण्यात सोमवारी १० टक्केही रेस्टॉरंट आणि बार उघडले नव्हते.कल्याण-डोंबिवलीतही प्रतिसाद नाही : कल्याण-डोंबिवलीतील हॉटेलमध्येही प्रत्यक्ष खानपान सेवा न देता केवळ पार्सलवरच व्यावसायिकांनी भर दिला.स्थानिक प्रशासनाचे वेगळे नियम नाहीराज्य शासनाने दिलेल्याच अटी व नियमांचे पालन शहरातील हॉटेल व्यावसायिकांना करायचे आहे. याबाबत महापालिकेचे वेगळे काही नियम नाहीत, असे ठाणे महानगरपालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.आज संकष्टी चतुर्थी असल्याने उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी हॉटेलमध्ये आलो. हॉटेल सुरू होण्याची वाट पाहत होतो. हॉटेलमध्ये सुरक्षितता पाळली जात असल्याने उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास हरकत नाही.- वैभव पाटील,ग्राहककोरोनाचे नियम पाळून ग्राहकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. हॉटेल/रेस्टॉरंटचा व्यवसाय हा रात्रीच्या जेवणावर जास्त अवलंबून असतो. त्यामुळे शासनाने वेळ वाढवून सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत करावी.-राघवेंद्र शेट्टी,हॉटेल व्यावसायिकदरवाढ नाहीखाद्यपदार्थांच्या दरांत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. परंतु, पदार्थांमध्ये बदल झाला आहे. जिथे सिंगल पदार्थ मागविले जात होते, तिथे कॉम्बो मेन्यू केले आहे. ग्राहकांना थेट थाळी दिली जाणार असल्याचे व्यावसायिक सनी पावसकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या