शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CoronaVirus News: भिवंडीमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणामुळे यंत्रणेवरील ताण झाला हलका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 01:02 IST

विविध उपाययोजनांमुळे मागील तीन महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात हलका

- नितीन पंडित भिवंडी : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भिवंडीत कोरोनाचा पहिला रु ग्ण आढळला. सुरु वातीच्या काळात रु ग्णसंख्या कमी होती. मात्र, मे आणि जूनमध्ये शहर व ग्रामीण भागांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. रु ग्णसंख्या अधिक व कोविड सेंटरची संख्या कमी, त्यातही आॅक्सिजन बेडची संख्या नाममात्र, अशी परिस्थिती असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, विविध उपाययोजनांमुळे मागील तीन महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात हलका झाला आहे.शहरातील कोरोनाच्या वाढत्या समस्येला सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सुरु वातीला आयजीएम रु ग्णालयाला कोविड रु ग्णालय म्हणून जाहीर केले. मात्र, केवळ १०० बेडच्या या कोविड रुग्णालयामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण वाढला होता. तो लक्षात घेता महापालिकेने शहरातील १० खासगी रु ग्णालयांना कोविड रु ग्णालयाची मान्यता दिली. मात्र, या खासगी रुग्णालयांमध्ये पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने या रु ग्णालयांवरही ताण वाढला होता. दरम्यान, काही खासगी रुग्णालयांकडून रु ग्णांची लूट होत असल्याच्या घटना समोर आल्या.बेड अधिक, रुग्ण कमीगणेशपुरी येथे ३०० बेड, तर सावद येथे 700 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. आजमितीस, शहर व ग्रामीण भागांत सुमारे 3000 हून अधिक बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध केले आहेत. तर, खासगी रुग्णालयेवगळता केवळ सरकारी कोविड रुग्णालयांमध्ये 80डॉक्टर असून परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत. जूनच्या तुलनेत सध्या रु ग्णसंख्या कमी झाल्याने बेडसंख्या अधिक, तर रु ग्णसंख्या कमी असे भिवंडीतील चित्र आहे.कोविड सेंटरसाठी २० ते ३० लाखांचा खर्च सध्या शहरात 294 तर ग्रामीण भागांत ५८८ असे केवळ 882 रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी तीन हजार बेड आधीच उपलब्ध आहेत. त्यामुळे गणेशपुरी येथील कोविड सेंटर तयार असूनही ते सुरू केले नाही.कारण, एका सेंटरसाठी साधारणत: २० ते ३० लाखांचा महिना खर्च येतो. त्यामुळे गणेशपुरी येथील कोविड सेंटर सुरू केले नाही. मात्र, पूर्वतयारी म्हणून हे कोविड सेंटर सध्या तयार करून ठेवले आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोकाशी यांनी दिली.दिवसाला रुग्णांची संख्या ३० च्या घरात शहरात 218 बाधितांवर उपचार सुरू असून त्यामानाने वैद्यकीय कर्मचारी तीन ते चारपट जास्त आहेत.शहरात आधी जी रुग्णसंख्या दिवसाला 200 ते २५० च्या घरात होती, ती आता १५ ते ३० च्या घरात आली आहे.रुग्णसंख्या अशीच कमी राहिली, तर पुढे ओसवालवाडी व रईस हायस्कूल ही दोन कोविड सेंटर बंद करण्याच्या विचारात प्रशासन आहे. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहितीही डॉ. मोकाशी यांनी दिली.प्रशासनाने रईस हायस्कूल, ओसवाल हॉल ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर उभारली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या