शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पाच बेड राखीव ठेवण्याचे आदेश कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 01:50 IST

रिपोर्ट न मिळालेल्या रुग्णांची हेळसांड केली जात असल्याने प्रशासनावर संताप व्यक्त

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत संशयित रुग्णांचे रिपोर्ट येण्यास दोन दिवस लागतात. रिपोर्ट प्राप्त न झालेल्या रुग्णांमध्ये आजार बळावला तर उपचार करण्यासाठी सरकारी व खासगी रुग्णालयांत किमान पाच बेड राखीव ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र अनेक रुग्णालयांकडून हे आदेश धाब्यावर बसवण्यात आले असून रुग्णांना दाखल करण्यास नकार दिला जात असल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.रिपोर्ट न मिळालेल्या रुग्णांची हेळसांड केली जात असल्याने प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्या रुग्णाला ताप आला तरी त्याची माहिती खाजगी रुग्णालयांनी महापालिकेस तातडीने देणे बंधनकारक आहे. सौम्य लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचा चाचणी अहवाल जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत खाजगी रुग्णालयांनी उपचार करणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक यापूर्वीच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी काढले आहेत. रिपोर्ट प्राप्त न झालेल्या रुग्णांकरिता प्रत्येक खाजगी रुग्णालयाने पाच बेड आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. हे बेड आयसोलेशनमध्ये असण्याची सक्ती केली आहे. रुग्णालये या आदेशाकडे डोळेझाक करतात. नांदिवली परिसरातील एका रिक्षाचालकाला सरकारी व खाजगी रुग्णालयात बेड मिळणे मुश्किल झाले होते. शुक्रवारी महापालिका हद्दीत बेड न मिळाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीत गुरुवारपर्यंत चाचणी अहवाल न आलेले ४४२ व्यक्ती होत्या.रिपोर्टच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात नाहीत, अशा एकदोन तक्रारी करणारे फोनकॉल्स दररोज प्राप्त होतात. मात्र, एकाही रुग्णालयावर अद्याप कारवाई केलेली नाही.- डॉ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkdmcकल्याण डोंबिवली महापालिका