शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: आतापर्यंत फक्त 10 टक्के लसीकरण; साडेअकरा लाख जण झाले लसवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 23:32 IST

लसींच्या तुटवड्यामुळे केंद्रांवर गर्दी वाढली : साडेअकरा लाख जण झाले लसवंत

सुरेश लोखंडेठाणे : कोरोना महामारीतून स्वत:चा बचाव करण्यासाठी एकमेव आधार ठरलेली कोरोना प्रतिबंधात्मक लस आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ दहा टक्के नागरिकांना देण्यात आली आहे.  जिल्ह्याची लोकसंख्या १ काेटी ११ लाखांच्या घरात असून, त्यापैकी जवळपास साडेअकरा लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात यंत्रणेला यश आले आहे. लसींचा तुटवडा पाहता, लस घेण्यासाठी जिल्ह्यातील २५८ लसीकरण केंद्रांवर वयोवृद्धांसह तरुणांची रोज एकच गर्दी होत आहे. 

काही दिवसापूर्वी शुकशुकाट असलेल्या लसीकरण केंद्रांवर आता ज्येष्ठांबरोबर तरुणांच्याही रांगा दिसत आहेत. या रांगेचा फायदा सर्वांना मिळत असून, आतापर्यंत ११ लाख ४७ हजार ६६१ जणांनी या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. १ मे नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनाही लस दिली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात आता १९ वर्षांच्या ६९ हजार २०७ तरुणांसह २९ वर्षांच्या १० लाख १६ हजार ८२४ अशा १० लाख ८६ हजार तरुणांच्या लसीकरणाची भर पडली आहे. याशिवाय ३९ वर्षांच्या १५ लाख ९२ हजार ३६ तरुणांसह ५० वर्षांच्या आतील म्हणजे ४९ वर्षांपर्यंतच्या १६ लाख ८५ हजार ३१ जणांच्या लसीकरणाची जबाबदारी आता नव्याने वाढली आहे. या वाढीव लसीकरणास प्रारंभ झाल्यास आपणास लस घेण्यास विलंब होईल आणि नाहक कोरोनास बळी पडण्याच्या धास्तीतून २५८ केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसत आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसthaneठाणे