शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकला, जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 23:31 IST

CoronaVirus News: कोविड रुग्णांवर मुख्यत्वे शासकीय रुग्णालय, संलग्न रुग्णालये व महानगरपालिका रुग्णालयांतून उपचार करण्यात येत आहेत.

पालघर :  सद्यस्थितीत राज्यात कोरोनाने बाधित रुग्ण आढळत असल्याने कोविड रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी नागरिकांनी तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे. कोविड रुग्णांवर मुख्यत्वे शासकीय रुग्णालय, संलग्न रुग्णालये व महानगरपालिका रुग्णालयांतून उपचार करण्यात येत आहेत. तथापि, दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता, भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविड-१९ बाधित रुग्णांच्या उपचारासाठी खाटा कमी पडू नयेत, यासाठी रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.या सूचनांमध्ये रुग्णालयांनी तातडी नसलेल्या सर्व नॉन कोविड शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात, रुग्णालयात पुरेसा मास्क, ग्लोज, पर्सनल प्रोटेक्शन किट व आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा. ज्या नॉन कोविड रुग्णांच्या बाबतीत परिस्थितीत पूर्णत: नियंत्रणाखाली आहे, अशांना घरी सोडावे,  आदींचा समावेश आहे. 

कडक नियम पाळावेत ज्यांना बाह्यरुग्णसेवा देणे शक्य आहे, अशांना घरी सोडण्यात यावे. अशा प्रकारचे नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, नॉनकोविड आंतररुग्ण असलेल्या रुग्णाजवळ केवळ एकाच नातेवाईकास थांबण्याची परवानगी देण्यात यावी. रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांना शिंकणे, खोकणे याबाबतचे नियम पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :palgharपालघर