शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यातील ९९० माध्यमिक शाळांचे वर्ग भरवणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:52 IST

कोरोनाची भीती कायम; ६२६ शाळाच ऑनलाइन सुरू करता येणार, चाचपणी झाली पूर्ण

- सुरेश लोखंडेठाणे : शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र, राज्य शासन आणि शिक्षक संघटनांमध्ये मतभेद दिसत आहेत. तरीही, शासनाचा आदेश मिळताच शाळा सुरू करणे शक्य व्हावे म्हणून जिल्ह्यातील सक्षम शाळांची चाचपणी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील एक हजार ६१६ माध्यमिक शाळांपैकी केवळ ६२६ शाळांमध्ये पूर्णवेळ, अर्धवेळ आणि दिवसाआड वर्ग भरवता येणे शक्य आहे. तर, उर्वरित ९९० माध्यमिक शाळा कोरोनाच्या भीतीमुळे बंदच राहणार असल्याचे उघड झाले आहे.राज्य शासन १५ जून, तर केंद्र सरकार आॅगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यास शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींचा विरोध दिसत आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने केलेल्या चाचपणीत ९९० शाळा या शहरात व कोरोनाच्या  कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. त्यामुळे त्या सुरू करण्याचे नियोजन नसल्याचे निदर्शनात आले आहे. याला शिक्षण विभागानेही दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात सध्या सव्वाआठ लाख विद्यार्थी पाचवी ते दहावीच्या वर्गात माध्यमिक शिक्षण घेत आहेत. जिल्ह्याच्या भिवंडी, शहापूर व मुरबाड या ग्रामीण भागामधील ३७ शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करता येणार आहेत. तर ४५ शाळा या अर्धवेळ भरवता येतील आणि दिवसाआड एक वर्ग भरवता येईल, असे ८२ शाळांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, ४६२ शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग न भरवता कधी शाळा तर कधी आॅनलाइन पद्धतीने त्यात विद्यार्थ्यांना शिकवता येईल, असे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी शासन निर्णयाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. अनेक शिक्षक कोविडच्या कामातजिल्ह्यातील पाच शाळा क्वारंटाइन कक्षासाठी वापरल्या जात आहेत. या पाच शाळांसह उर्वरित ९८५ शाळा सुरू करण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाकडे नसल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील २३ हजार शिक्षक सव्वाआठ लाख विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. या शिक्षकांपैकी शाळेच्या जवळपास राहणाऱ्या एक हजार शिक्षकांचा समावेश आहे. तर, ११२ शिक्षक कोविड - १९ चे काम करत आहेत. त्यामुळे अनेक शाळा सुरू करण्याबाबत नियोजन नसल्याचे उघड झाले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या