शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: काेराेनाचा कहर झाल्याने ‘रेमडेसिवीर’ची वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:41 IST

इंजेक्शनच्या टंचाईची धास्ती : किमतीतील फरकांमुळे रुग्ण चिंतेत

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये उपचार घेणाऱ्या रुग्णांनी पूर्णत: भरली गेली आहेत. दुसरीकडे, कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढली असताना किमतीतील फरकांमुळे रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.महापालिका हद्दीत हजारांहून अधिक कोरोना रुग्ण दररोज आढळून येत आहेत. सध्या साडेनऊ हजारांहून अधिक रुग्ण मनपासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काही रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून येत असली तरी फुप्फुसांत संसर्ग झालेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोर्स दिला जात आहे. संबंधित रुग्णाला या कोर्समध्ये दिवसाला एक अशी सहा इंजेक्शन दिली जातात. रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोना रुग्णासाठी प्रभावी ठरत असले तरी या इंजेक्शनची उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत. या इंजेक्शनची एमआरपी किंमत साडेचार हजार रुपयांच्या आसपास आहे. पण, सरकारी नियमानुसार केडीएमसीच्या रुग्णालयांत हे इंजेक्शन प्रती १२०० रुपयांप्रमाणे उपलब्ध होत आहेत तर काही खासगी रुग्णालयांमध्ये हे इंजेक्शन प्रति पाच ते साडेपाच हजारांपर्यंत मिळत असल्याने हे इंजेक्शन खर्चिक पडते. सरकारी नियमानुसार हा कोर्स १३ हजारांमध्ये होणे अपेक्षित असताना खासगी उपचारपद्धतीत त्यासाठी ३० ते ३५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावात कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मनपाची रुग्णालये रुग्णवाढीमुळे भरली असल्याने त्या ठिकाणी सर्वसामान्यांनाही बेड मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. एकाच कुटुंबातील दोन ते तीन जण उपचार घेत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या या इंजेक्शनची मागणी वाढल्याने किमती सरकारी नियमानुसार आकारण्यात याव्यात, अशी मागणी रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक करत आहेत.पुरवठा वाढविण्यावर भरमध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी ही काही प्रमाणात घटली होती. त्यामुळे काही रुग्णालयांनी पुरवठा करण्यावर देखील भर दिला नव्हता; परंतु अचानक रुग्ण संख्या वाढल्याने आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढल्याने आता पुरवठा वाढविण्यावर भर देण्यात आला असून त्यामुळे भविष्यात इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस