शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना चाचण्या वाढवल्याने मृत्युदर घटला- पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:36 IST

कल्याणमध्ये ‘मिशन झीरो कोविड केसेस’चा शुभारंभ

कल्याण : कोरोनाच्या चाचण्या वाढविल्याने मृत्युदर कमी झाला आहे. तसेच सगळीकडे कोविड क्वारंटाइन सेंटर, केअर सेंटर आणि रुग्णालये चांगल्या आरोग्य सुविधांयुक्त उभारल्याने कोरोना नियंत्रणात येत असला तरी तो शून्यावर गेला पाहिजे. ‘एमसीएचआय क्रेडाई ’ने त्यासाठी उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे, असे उद्गार पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे काढले.शहरातील आधारवाडी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे एमसीएचआय क्रेडाई या बिल्डर संघटनेने सुरू केलेल्या ‘मिशन झीरो कोविड केसेस’ या मोहिमेचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आाला.याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, महापौर विनीता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे, पदाधिकारी रवी पाटील, मनोज राय, राजन बांदेलकर आदी उपस्थित होते.शिंदे म्हणाले की, २४ दिवसांत एक हजार बेडचे कोविड रुग्णालय उभारणे, हा विनोद नाही. सध्या तात्पुरती उभारलेली कोविड रुग्णालये कायमस्वरूपी करा, अशी मागणी उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून होत आहे. कोरोनाशी लढा देताना डॉक्टर आठ तासांपेक्षा जास्त तास पीपीई किट घालून रुग्णांवर उपचार करत आहेत. मी स्वत: पीपीई किट घालून रुग्णांची विचारपूस केली आहे. दोन तास जरी पीपीई किट घातले, तरी जीव गुदमरल्यासारखा होतो. डॉक्टर कसे काय आठ तासांपेक्षा जास्त काम करतात? त्यांच्या सेवेवर टीका करणे, हे योग्य नाही. दुसऱ्यांचा जीव धोक्यात असेल तर, आपला जीव धोक्यात घालून त्यांचा जीव वाचविला पाहिजे, ही शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाली असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.ते पुढे म्हणाले, एमएमआर क्षेत्र व राज्यातील कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवले, त्यामुळे मृत्युदर कमी झाला. परंतु, जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुुंबई, ठाणे येथे एमसीएचआयने मिशन झीरो कोविड केसेस ही मोहीम सुरू केली आहे. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत आजपासून ती सुरू होत आहे. हे सांगताना एमसीएचआयच्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शिंदे यांच्या हस्ते कोरोना जागृतीच्या पाच व्हॅन व कोरोना अ‍ॅण्टीजेन टेस्टच्या पाच फिरत्या व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEknath Shindeएकनाथ शिंदे