शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पालघरच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:54 IST

रुग्णसंख्या दीडशेहून अधिक; नागरिकांमध्ये घबराट

विक्रमगड/वाडा : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि वाडा या दोन तालुक्यांसह ग्रामीण भागामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असून पावसाळा सुरू झाल्याने आणखीनच चिंता वाढली आहे. या दोन्ही तालुक्यांसह ग्रामीण भागातील रुग्णांनी दीडशतक पार केले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विक्रमगड तालुक्यातील बाधितांची संख्या ४७ वर पोहोचली असून वाडामध्येही रुग्णसंख्या ६० वर, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ७० च्या पुढे गेली आहे. विक्रमगड तालुक्यात १० दिवसांपूर्वी एकही रुग्ण नव्हता, मात्र काही दिवसांपूर्वी १४ वर्षाच्या मुलाला कोरोना संसर्ग झाला होता.त्याला मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या निकट संपर्कातील ४२ जणांना शिळ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यातील त्यांचे सर्वांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. शुक्रवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ३३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची एकूण रु ग्ण संख्या ४७ झाल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे.या ३३ पॉझिटिव्ह रुग्णांचा निकट संपर्क आलेल्यांची यादी बनवण्याचे काम सुरू असून त्यांना क्वॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. या पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.वाडामध्येही रुग्णसंख्येने अर्धशतक गाठले आहे. तालुक्यात शुक्रवारी रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या ६० वर गेल्याने भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी भावेघर येथे १३, वाडा ३ असे १६ रुग्ण बाधित आढळले आहेत. या रुग्णांना पोशेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी दिली.ग्रामीण भागात चिंतापालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागांतही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत ७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांची संख्या दीडशतकापार गेली असल्याने चिंंता वाढली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या