शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कळमकर कुटुंबीयांना ५० लाखांचा धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:03 IST

कोरोनामुळे मृत्यू; मुलीला मिळाली नोकरी

कल्याण : कोरोनामुळे मरण पावलेले पोलीस नाईक संतोष कळमकर यांच्यासह अन्य पोलीस कुटुंबीयांच्या व्यथा ‘लोकमत’ने सोमवारी मांडल्यानंतर कळमकर यांच्या कुटुंबाला राज्य सरकारतर्फे ५० लाख रुपये मदतीचा धनादेश तातडीने सुपूर्द करण्यात आला. याखेरीज बदलापूर येथील भाजप नगरसेवक संभाजी शिंदे यांनीही कळमकर कुटुंबाला ११ हजार रुपयांचा धनादेश दिला.डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक संतोष कळमकर यांचा आॅगस्टमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. एक महिना उलटूनही सरकारी मदत त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली नव्हती. त्यांच्या दोन्ही मुली सुपर्णा आणि ऐश्वर्या पदवीधर आहेत. परंतु कोरोनामुळे नोकरी मिळविणे लागलीच शक्य नव्हते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच, सरकारी स्तरावर दखल घेण्यात आली. सोमवारी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांच्या हस्ते कळमकर यांच्या पत्नी श्वेता आणि मुली सुपर्णा, ऐश्वर्या यांनी ५० लाखांचा धनादेश स्वीकारला.बदलापूरचे नगरसेवक शिंदे यांनीही या कुटुंबाला मदत केली. सुपर्णा हिने अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात रूजू होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु भरती प्रक्रिया थांबल्याने तूर्तास ते शक्य नाही. यावर नगरसेवक शिंदे यांनी तुर्तास त्यांच्या बांधकाम व्यवसायात सुपर्णाला नोकरी दिली.‘लोकमत’चे मानले विशेष आभारकळमकर कुटुंबाने ‘लोकमत’चे विशेष आभार मानले. ‘लोकमत’च्या रूपाने आजही माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव आला, अशा शब्दांत मुलगी सुपर्णा हिने भावना व्यक्त केल्या. तर नगरसेवक शिंदे यांनीही ‘लोकमत’मुळे कळमकर कुटुंबीयांची व्यथा जाणता आली आणि त्यांना मदत करता आल्याची प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या