शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: ‘निर्बंध नव्हे, हे तर लॉकडाऊनच’; व्यापारी संघटनेचा आराेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 23:51 IST

राज्यात लागू झालेल्या मिनी लॉकडाऊनविरोधात अंबरनाथमधील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने गोड बोलून आम्हाला धोका दिल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अंबरनाथ : राज्यात लागू झालेल्या मिनी लॉकडाऊनविरोधात अंबरनाथमधील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने गोड बोलून आम्हाला धोका दिल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कडक निर्बंधाच्या नावावर शासनाने व्यापाऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खांजी झाले यांनी केला आहे.दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या बैठकीत दुकाने रात्री आठपर्यंत सुरू राहतील, मात्र शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन असेल, असा निर्णय घेण्यात आला. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडूनही अशाच प्रकारच्या सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आल्या. मात्र, मंगळवारी सकाळपासून अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील दुकाने अचानकपणे बंद ठेवण्यास सांगण्यात आल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. सरकारने आधी वीकेंड लॉकडाऊन सांगितला, कडक निर्बंध सांगितले आणि नंतर अचानक गोड बोलून आम्हाला धोका दिला, असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. याविरोधात बैठक घेऊन आंदोलनात्मक पवित्रा घेणार असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नेमके दुकाने सुरू ठेवायची की नाही, याबाबत प्रशासनामध्येच संभ्रम होता. त्यातच मंगळवारी अंबरनाथमध्ये नियमितप्रमाणे आपली दुकाने सुरू केली होती. मात्र, दुपारनंतर दुकाने बंद करण्यासाठी आली हाेती. फेरीवाल्यांकडून ‘ब्रेक द चेन’चा फज्जामीरा रोड : कोरोनाचा झपाट्याने संसर्ग पसरल्याने पुन्हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ ची अमलबजावणी सुरु झाली असली तरी शहरातील फेरीवाल्यांच्या ठिकाणी होणारी प्रचंड गर्दी पाहता कोरोना  उद्देशाचाच फज्जा उडाला आहे. गर्दीचा मुद्दा उपस्थित करतानाच काही दुकानदारांनी आंदोलन केले .दुकाने अचानक बंद केल्याचा मुद्दा उपस्थित करत मंगळवारी काही दुकानदारांनी पालिका मुख्यालयाबाहेर संताप व्यक्त केला. मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत दुकानदारांच्या समर्थनार्थ धाऊन गेले. यावेळी दुकानदारांनी काही काळ रस्तारोको केला. पालिकेने अचानक सोमवारी रात्री दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या