शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हॉटेल-बार बंदची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 01:29 IST

शहरांत ठिकठिकाणी सुरू असलेल्या बार, रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढती आहे. त्यांच्या या संपर्कामुळे हा संसर्ग होण्याची संभाव्यता लक्षात घेत ते बंद करण्याची मागणी होत आहे.

ठाणे : मुंबईस लागून असलेल्या ठाणे शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यावरील उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनासह डॉक्टरांकडून सर्वपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहरांत ठिकठिकाणी सुरू असलेल्या बार, रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्यावाढती आहे. त्यांच्या या संपर्कामुळे हा संसर्ग होण्याची संभाव्यता लक्षात घेत ते बंद करण्याची मागणी होत आहे.सामाजिक जबाबदारीचे भान राखून गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने आधीच केले आहे. सार्वजनिक ठिकाणांवरील कार्यक्रम थांबवले आहेत. गुढीपाडव्याच्या मिरवणुकाही आयोजकांनी रद्द केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर मंदिरांमधील भक्तांची गर्दी टाळण्यासाठी संबंधित व्यवस्थापकांनी मंदिरेदेखील बंद ठेवण्याचे नियोजन केले. या उपाययोजनांच्या दृष्टीने बार, रेस्टॉरंट, हॉटेलमधील ग्राहकांची गर्दी रोखण्यासाठी ते काही दिवस बंद करण्याच्या दृष्टीने सामाजिक संघटना पुढे येण्याच्या प्रयत्नात आहेत.कोरोनाचा संसर्ग झालेल्याची संख्या सातवर गेली आहे. डॉक्टरांच्या निगराणीतील या रुग्णांना मासिक आधार देऊन या संकटातून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.कोरोनाच्या या संकटाला राष्टÑीय आपत्ती म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापनाचा कायदा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लागू केला आहे.दूरध्वनीद्वारे मार्गदर्शननागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात सिव्हिल रुग्णालयातील परिचारिका नागरिकांच्या दूरध्वनींना उत्तरे देत आहेत. आतापर्यंत चार दूरध्वनी येऊन त्यांनी त्यांच्या इमारतीमध्ये परदेशातून आलेल्या मात्र दरवाजा बंद करून राहत असलेल्यांची माहिती दिल्याचे परिचारिकांनी सांगितले. तर उपाययोजनेच्या मार्गदर्शनासाठी जिल्ह्याभरातून फोन येत असल्याचेही सांगितले जात आहे. बार रेस्टॉरंट आणि हॉटेलमधील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने ते बंद करण्याची मागणी जोर धरत आहे, यावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.हॉटेल, बार, रेस्टॉरंट बंद केल्यास सकाळी घर सोडलेल्यांच्या खाण्यापिण्याचे वांधे होतील; पण ठिकठिकाणच्या रेस्टॉरंटमधील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने ट्रॉन्सपोर्ट बंद करावे लागेल. यामुळे नागरिक अन्य शहरात जाणे टाळतील आणि रेस्टॉरंटमधील गर्दी कमी होईल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhotelहॉटेल