शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: खलाशांना उतरण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:44 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : खलाशांच्या कुटुंबीयांमध्ये आनंद

बोर्डी : पाच दिवसांपासून डहाणू बंदरात उतरण्याची वाट पाहणाऱ्या खलाशांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला असून शुक्रवारी त्यांना उतरविले जाणार आहे. हा प्रश्न ‘लोकमत’ने मांडल्यानंतर या वृत्ताची दखल पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार राजेंद्र गावित यांनी घेतली. या निर्णयामुळे खलाशी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.गुजरात बंदरातून पालघर जिल्ह्यातील खलाशी मागील पाच दिवसांपासून डहाणू खाडी येथे उतरण्यासाठी प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत तालुक्याच्या समुद्रहद्दीत बोटी नांगरून आहेत. मात्र त्यांना उतरविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी नसल्याने स्थानिक प्रशासनाकडून खलाशांना उतरविले जात नव्हते. त्यांच्या जवळचा जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपल्यानंतर, मासेमारी करणाºयासाठी आलेल्या स्थानिकांना विनंती केल्याने त्यांनी पुरवठा केला. दुसरीकडे कुटुंबीय घरी परतण्याची आतुरतेने वाट पाहत असताना पुन्हा गुजरात बंदरात माघारी परतण्याची वेळ त्यांच्यावर ओढवणार होती.उंबरगाव बंदरात स्वजिल्ह्यातील खलाशांसह घडलेल्या दुर्दैवी घटनेची ही पुनरावृत्ती असल्याची खलाशांची संतप्त भावना ‘लोकमत’ने बातमीतून मांडली. त्याची दखल खासदार राजेंद्र गावित, पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली असून कमिशनर शिवाजीराव दौंड यांनी जिल्हा प्रशासनाला खलाशांना शुक्रवारी बंदरात उतरविण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.शिवसेना पक्ष हा नेहमीच मच्छीमारांच्या हिताचा विचार करणारा पक्ष असून पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार राजेंद्र गावित यांनी परराज्यात रोजगारासाठी गेलेल्या खलाशी कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.- वैभव संखे, पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या