शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

CoronaVirus News: सिटी हॉस्पिटलने दाखवला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:35 IST

अंबरनाथ पालिका; १० बेड राखीवचे आश्वासन हवेत

अंबरनाथ : अंबरनाथमधील सिटी हॉस्पिटल ताब्यात घेतले होते. मात्र, खासगी डॉक्टरांनी नियमांना बगल देत तेथे ताबा मिळवला आहे. या रुग्णालयात १० टक्के बेड शहरातील पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ठेवण्याचे आश्वासन सिटी हॉस्पिटल प्रशासनाने दिले होते. प्रत्यक्षात या ठिकाणी एकही बेड पालिकेने पाठवलेल्या रुग्णांसाठी राखीव नसल्याची बाब समोर आली आहे. रुग्णालय सुरू करण्यासाठी दिलेले आश्वासन धुळीस मिळविले आहे.नवरेनगर परिसरात असलेल्या सिटी रुग्णालयाचा ताबा खासगी डॉक्टरांनी घेतला आहे. शहरातील काही खाजगी डॉक्टरांनी एकत्रित येऊन याठिकाणी खाजगी कोविड रुग्णालय उभारले आहे. हे रुग्णालय उभारताना परवानगी मिळावी, यासाठी पालिकेकडे १० टक्के बेड पालिकेने पाठवलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आश्वासन सिटी रुग्णालय प्रशासनाने पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, हे रुग्णालय सुरू होऊन दोन आठवडे उलटले, तरी या रुग्णालयात पालिकेने एकाही रुग्णाला पाठवलेले नाही तसेच सिटी रुग्णालय प्रशासनानेदेखील या ठिकाणी कोणतेही बेड पालिकेतून आलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेले नाहीत. १० टक्के बेडचे आश्वासन हे रुग्णालयाकडून हवेतच विरले आहे.आयसीयू कक्ष उभारण्याची तयारीसुरुवातीला हेच सिटी रुग्णालय पालिकेने कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, पालिकेने डेंटल कॉलेजमध्ये कोविड रुग्णालय उभारल्यानंतर या सिटी रुग्णालयात आयसीयू कक्ष उभारण्याची तयारी केली होती.मात्र, राजकीय दबाव वापरून सिटी रुग्णालय प्रशासनाने हे रुग्णालय स्वत:च्या ताब्यात घेतले तसेच पालिकेकडून विरोध होणार नाही, यासाठी राजकीय दबाव वापरला. हे करत असताना स्थानिकांचा विरोधही मोठ्या प्रमाणात होता. हा विरोध दडपण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने १० टक्के बेड शहरातील नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, रुग्णालय सुरू झाल्यावर बेडच उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.सिटी रुग्णालयाबरोबर झालेल्या करारानुसार या ठिकाणी ८० टक्के बेड सरकारी दराने रुग्णांना उपलब्ध करून देण्याचे निश्चित झाले आहे. रुग्णालय प्रशासनाने स्वत:हून काही आश्वासने दिली असतील, तर त्यासंदर्भात त्यांनी कार्यवाही करावी. - प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी