शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मुंब्य्रातील काळसेकर रुग्णालयाचा अनागोंदी कारभार: पालिका अधिकाऱ्यांनीच केला पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 20:32 IST

अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या उपचाराच्या नोंदीच गायब!, ठाणे महापालिकेने बजावली कारणो दाखवा नोटीस

ठाणे : कोरोना रुग्णांसाठी असलेल्या आणखी एका रुग्णालयाचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे. मुंब्य्रातील काळसेकर या कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील रुग्णांवर कोणते उपचार सुरु आहेत, याच्या नोंदीच नसल्याचा धक्कादायक प्रकार पालिका प्रशासनाने केलेल्या पाहणीमध्ये समोर आला आहे. त्यामुळे या रुग्णालयालाही 48 तासांमध्ये खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. हा खुलासा असमाधानकारक आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही या नोटीसीद्वारे देण्यात आला आहे.

गेल्याच आठवडयामध्ये ठाण्यातील ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या रुग्णालयांनी सौम्य लक्षणो असलेल्या रुग्णानांही अतिदक्षता विभागामध्ये दाखल केले होते. त्यामुळे ज्यांना गंभीर स्वरुपाचा आजार आहे, अशा रुग्णांना जागा मिळणोही अवघड झाले होते. हा प्रकार निदर्शनास येताच सफायरला तीन लाखांचा तर ठाणो हेल्थ केअरला 13 लाखांचा दंड पालिका प्रशासनाने ठोठावला आहे. राज्यात पालिका प्रशासनाने केलेली अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई ठरली.

दरम्यान, मुंब्य्रातील काळसेकर या कोविड रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराच्याही तक्रारी आल्यानंतर आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्यासह पालिकेच्या काही डॉक्टरांनी 11 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान पीपीई किट परिधान करुन या रुग्णायाची पाहणी केली. त्यावेळी अनेक गैरप्रकार या पथकाच्या निदर्शनास आले. अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांच्या उपचाराच्या दैनंदिन वैद्यकीय नोंदीमध्येच हलगर्जीपणा होता. याच विभागातील रुग्णांच्या फुफुसाच्या गंभीर बाबींचा आढावा घेण्यासाठी क्ष किरण प्रतिमा काढलेली नव्हती. ज्या काढल्या होत्या त्यांचा दर्जाही सुमार होता. याठिकाणी आयसीयू आणि एनओयू दोन्ही मिळून नऊ खाटा दाखविण्यात आल्या होत्या. परंतू, ठामपाच्या कोविगार्ड पोर्टलवर या रुग्णालयात 43 जागा असल्याचे दाखवून पालिकेची दिशाभूल करण्यात आले होते. याच रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर 412 क्रमांकाच्या कक्षात चार खाटांवर कोविडचे रुग्ण होते. तिथेच जुन्या लाकडी सामानांसह भंगाराची साधसामुग्री होती. रुग्णांच्या कक्षात टाकाऊ सामान असणो हाही रोगाला खतपाणी देण्याचाच प्रकार होता.

रुग्णालयाच्या या कृतीमुळे रुग्ण तसेच रुग्णालयातील कर्मचारी यांच्या जीवालाही धोका संभवत असून ही गंभीर बाब असल्याचे निरीक्षण पालिकेच्या पथकाने नोंदविले आहे. रुग्णांच्या दैनंदिन स्थिती आणि त्यानुसार उपचारांमध्ये केलेले बदल याच्या कोणत्याही नोंदी आढळल्या नाही. ही बाब बेकायदेशीर असून त्यामुळे उपचारामध्येही चुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णाच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गंभीर बाबीनेही मुळात जीवघेण्या असलेल्या आजाराने ग्रस्त रुग्णाच्या मृत्युचे कारण होऊ शकते, असेही निरीक्षण पालिकेच्या पथकाने नोंदविले आहे. या सर्व कारणांमुळे येत्या 48 तासांमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाकडे खुलासा करण्याचे आदेश बजावणारी नोटीस रविवारी या रुग्णालयाला बजावण्यात आली आहे. मुदतीमध्ये जर या रुग्णालयाने आपले म्हणणो सादर केले नाही तसेच खुलासा समाधानकारक वाटला नाहीतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या नोटीसीमध्ये देण्यात आला आहे.

‘‘ कोविडसह कोणत्याही रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात रुग्णावर काय उपचार केले याच्या नोंदी असणो आवश्यक असते. तेच या रुग्णालयात आढळले नाही. इतरही काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यामुळे काळसेकर रुग्णालयाला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.’’ विश्वनाथ केळकर, उपायुक्त, आरोग्य विभाग, ठाणे महापालिका.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या