शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनामुळे ढोल-ताशा पथकांच्या यंदाही ऑर्डर्स झाल्या रद्द; सलग दुसऱ्यावर्षी लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 23:29 IST

शिवयजंयती, गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रामनवमी, हनुमान जयंती, महाशिवरात्री, दिवाळी पहाट, दिवाळी पाडवा या सण उत्सवात ठाणे शहरात हमखास ढोल-ताशांचा गजर असतो.

ठाणे : शहरात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेनिमित्ताने शहरात विविध ठिकाणी ढोल-ताशा पथकांचा गजर ऐकायला मिळतो; परंतु कोरोनामुळे यावषीर्ही पथकांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या असून, त्यामुळे ढोल-ताशा पथकांचा आवाज निनादणार नाही. इतर सण उत्सवानिमित्त केल्या जाणाऱ्या पथकांच्या सरावाला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक लागला आहे. 

शिवयजंयती, गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रामनवमी, हनुमान जयंती, महाशिवरात्री, दिवाळी पहाट, दिवाळी पाडवा या सण उत्सवात ठाणे शहरात हमखास ढोल-ताशांचा गजर असतो. कोरोनामुळे सण उत्सवांवर निर्बंध आल्याने यावर्षीही ढोल-ताशा पथकांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी शहरात विविध ठिकाणी ढोल-ताशांचे पथक या यात्रेची शोभा वाढवितात. ठिकठिकाणी ढोल-ताशांचा आवाज निनादत असतो. 

यंदा मात्र ऑर्डर्स रद्द झाल्याने पथकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्यांच्या ऑर्डर्स्‌ला ब्रेक लागला आहे. तसेच, सरावालाही परवानगी नसल्याने शहरातील ढोल-ताशा पथकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी या पथकांनी ढोल-ताशांचे सामान विकत घेतले होते, तेदेखील तसेच पडून राहिल्याने त्याचा वापर होत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

लॉकडाऊनआधी ढोल-ताशांचे व्यापाऱ्यांकडून सामान मागविले होते. मार्च - एप्रिलमध्ये ऑर्डर्स रद्द झाल्या. आता सामान तसेच पडून आहे. गुढीपाडव्यानिमित्त सर्व तयारी केली होती; परंतु कोरोनाचे निर्बंध पुन्हा लागले. सगळ्या सामानांचे पैसे देण्याचे राहिले असून, आर्थिक गणित बिघडले आहे. मागच्या रविवारी सराव करायला घेतला होता, पण पोलिसांनी बंद करायला सांगितले. - संतोष शिगवण, शिवरुद्र ढोल-ताशा पथक

ढोल-ताशांचे सामान विकायची वेळ आली आहे. वर्षभर पथक बंद आहे. अंगावर कर्ज झाले असून, अनेक आर्डर्स रद्द झाल्या आहेत. पुढच्या गणेशोत्सवाला संधी मिळते की नाही याची शंकाच वाटते. सरावदेखील बंद आहे. - वैभव दाणे, शिवमल्हार ढोल-ताशा

गेल्या वर्षीपासून ऑर्डर्स बंद आहेत. ऑर्डर्स आल्या तरी परवानगी मिळत नाही. निर्बंध असल्यामुळे आता काहीच करू शकत नाही. ढोल-ताशांचे सामान तसेच पडून आहे. यावर्षीही ढोल-ताशा वाजवायची संधी मिळेल असे वाटत नाही. मिळाली तर वादकांच्या सहभागावर बंधनं येतील आणि १०-१५ वादकांमध्ये वाजविणे अशक्य आहे. - योगेश तेली, संस्कृती युवा प्रतिष्ठान

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या