शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाचा अहवाल न आल्याने दोघे चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:40 IST

चाचणीला ११ दिवस उलटले : मृताची पत्नी, मुलाचे हाल

अंबरनाथ : अंबरनाथमधील पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मुंबईतच उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकारानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या चार कुटुंबीयांची आणि २० इतर नातेवाइकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, जवळच्या संपर्कातील चौघांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली होती. या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्ताच्या पत्नी आणि मुलालाही रुग्णालयात दाखल केले. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. ११ दिवस उलटले तरी त्यांचे अहवाल न आल्याने ते दोघेही चिंतेत आहेत. अहवालच येत नसल्याने त्यांचे रुग्णालयातही हाल होत आहेत.अंबरनाथमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण हा बुवापाडा परिसरात सापडला. त्याच्या संपर्कातील चौघांची चाचणी केली. त्यापैकी पत्नी आणि मुलाला लागलीच सोडण्यात आले. दोन्ही पुतण्यांना रुग्णालयातच क्वारंटाइन केले. चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अहवालानंतर अंबरनाथ पालिकेने मृत झालेल्या कोरोनाग्रस्ताची पत्नी आणि मुलालाही तपासणीसाठी ठाण्याच्या रुग्णालयात पाठविले. त्यांची स्वॅब चाचणीही घेण्यात आली. ११ दिवस उलटले तरी अद्याप या दोघांचेही अहवाल आलेले नाही. त्यामुळे हे दोघेही चिंतेत आहेत. दुसरीकडे त्यांच्यासोबत असलेले त्यांचेच दोन्ही नातेवाईक हे कोरोनावर उपचार घेऊन घरीही गेले.‘त्या’ सहा जणांचे अहवाल निगेटिव्हअंबरनाथमध्ये राहणारे व मुंबई महापालिकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचारही सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सहा सदस्यांची कोरोना चाचणी केली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे संभाव्य धोका टळला आहे.अंबरनाथमध्ये एकच कोरोनाग्रस्तअंबरनाथमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळले होते. एकाचा मृत्यू झाला असून, दोघे बरेही झाले आहेत. सध्या एकच रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे आजच्या घडीला अंबरनाथमध्ये कोरोनाचा एकच रुग्ण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या