शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : भाईंदरमध्ये विलगीकरण केंद्रावरून संताप, नागरिक, पोलिसांमध्ये झाला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 02:20 IST

भाईंदर पूर्वेच्या पालिका क्रीडा संकुलासमोरील स्वतंत्र इमारतीत पालिकेने सुरू केले आहे. यामुळे संतप्त लोकांनी या ठिकाणी विरोध केला व घोषणा दिल्या.

मीरा रोड/ भाईंदर : मीरा रोड येथील डेल्टा गार्डनजवळ विलगीकरण केंद्र सुरू करण्यास भाजप नगरसेवकांसह काही नागरिकांनी विरोध केल्याने तेथील प्रस्ताव गुंडाळत केंद्र आता भाईंदर पूर्वेच्या पालिका क्रीडा संकुलासमोरील स्वतंत्र इमारतीत पालिकेने सुरू केले आहे. यामुळे संतप्त लोकांनी या ठिकाणी विरोध केला व घोषणा दिल्या. या वेळी सामान आणणारी वाहने नागरिकांनी अडवली असता पोलिसांशी वाद झाला.परदेशातून आलेल्या; परंतु कोरोना नसलेल्या नागरिकांना खबरदारी म्हणून १४ दिवसांसाठी विलगीकरण केंद्रात ठेवण्याची आवश्यकता आहे. मीरा- भार्इंदरमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या १०५ झालेली आहे; परंतु शहरात पालिकेने विलगीकरण केंद्रच सुरू केले नसल्याने ते नागरिक घरातच राहत आहेत.पालिकेने मीरा रोडच्या डेल्टा गार्डनजवळील स्वतंत्र इमारतीत विलगीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पक्की केली असता भाजप नगरसेविकेसह काहींनी विरोध केला. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्याकडे बैठक झाली. येथे केंद्र सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली असताना राजकीय विरोधामुळे महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी येथील प्रस्तावच रद्द केला.भार्इंदर पूर्वेच्या इंद्रलोक - न्यू गोल्डन नेस्ट भागात क्रीडा संकुलासमोरील सोनम बिल्डर यांनी विकसित करून पालिकेस दिल्या जाणाऱ्या एमएमआरडीए योजनेतील स्वतंत्र इमारतीच्या पहिल्या मजल्यावर केंद्र सुरू करण्याचा निर्णय बुधवारी आयुक्तांनी जाहीर केला होता; परंतु याची माहिती मिळताच रात्री नागरिक जमले व त्यांनी विरोध दर्शवला. गुरुवारी सकाळीही नागरिक जमले होते. डेल्टा गार्डनजवळचे केंद्र राजकीय दबावाखाली बंद करता आणि आमच्याकडे पोलीस बंदोबस्त घेऊन सुरू करता, असा सवाल केला. येथे केंद्र सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला.आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी, डेल्टा येथे सुविधा नव्हती व येथे सुविधा असल्याने केंद्र सुरू केल्याचे सांगत नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे आश्वस्त केले. या वेळी स्थानिक नगरसेविका तारा घरत, स्नेहा पांडे, जयंतीलाल पाटील व हरिश्चंद्र आमगावकर यांनी आयुक्तांना नागरिकांच्या मनात असलेली भीती व त्यांची काळजी घेण्याची मागणी केली; परंतु आयुक्तांनी केंद्र सुरू करत असल्याचे सांगत विरोध केल्यास कारवाई करू, असा इशारा दिला.पोलिसांविरोधात दिल्या घोषणा : केंद्रासाठी सामान आणणाºया गाड्या अडवल्या असता, पोलीस आणि नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली; परंतु पोलिसांनी विरोध मोडून काढला. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने नागरिकांनी आमदार गीता जैन यांच्या निषेधार्थ तसेच पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या. नागरिकांनी आपला मोर्चा जैन यांच्या कार्यालयाकडे वळवला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbhayandarभाइंदर