शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ६८८ रुग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 04:49 IST

एकूण बाधितांची संख्या १५ हजार ६८३ तर मृतांची संख्या ५११

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत रविवारी मोठी वाढ झाली. गेल्या २४ तासात ६८८ बाधितांची, तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १५ हजार ६८३ तर मृतांची संख्या ५११ झाली आहे. वाढत्या रुग्णांसोबतच मृतांची संख्या पाचशेच्या घरात गेली आहे.ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १४ जून रोजी १३४ नव्या कोरोनाबाधितांची तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे येथील रुग्णसंख्या पाच हजार १३९ तर मृतांची संख्या १५८ वर पोहचली आहे. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही १६९ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे या शहरात बाधितांची संख्या तीन हजार ९१२ तर मृतांची संख्या ११८ वर गेली. कल्याण डोंबिवलीमध्ये नव्या ७८ रुग्णांची नोंद झाली. येथे तिघांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या २,१४९ तर, मृतांची संख्या ६० वर पोहचली. मीरा भार्इंदरमध्ये ७९ रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या १,५९३ इतकी झाली. भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रात १0४ रुग्णांची नोंद नव्याने झाल्याने बाधितांची संख्या ५७४ इतकी झाली. उल्हासनगरमध्ये १८ नवे रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या ७६0 झाली. अंबरनाथमध्ये ६३ रुग्णांसह एकाचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १0 रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ४११ वर पोहचली. ठाणे ग्रामीण भागात ३३ रुग्णांची नोंद झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या