शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

coronavirus: ठाणे जिल्ह्यात बुधवारी झाली १४८७ कोरोना रुग्णांची वाढ, ३७ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 05:07 IST

जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या एक लाख २६ हजार ८३९, तर मृतांची संख्या आता तीन हजार ६१४ झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात एक हजार ४८७ रुग्णांसह ३७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या एक लाख २६ हजार ८३९, तर मृतांची संख्या आता तीन हजार ६१४ झाली आहे.यात कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक ४२९ रुग्णांसह १० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या २९ हजार ६४९, तर मृतांची संख्या ६४८ वर गेली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत २७३ बाधितांची, तर सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या २६ हजार ४०६, तर मृतांची संख्या ८५१ वर गेली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १९१ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात ३३ बाधितांसह दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या चार हजार २५२ झाली. तसेच उल्हासनगरात २४ रुग्ण सापडले असून दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये ४४ रुग्णांची, तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या पाच हजार ३७, तर मृतांची संख्या १९० झाली. बदलापूरमध्ये ५५ नवे रुग्ण वाढल्याने बाधितांची संख्या चार हजार २४३ इतकी झाली.वसई-विरारमध्ये १८३ नवे रुग्णवसई-विरार शहरात बुधवारी दिवसभरात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात १८३ नवे रुग्ण आढळून आले असून, १३८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती महापालिकेने दिली. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १७ हजार ०६९ वर पोहोचली आहे. तर शहरात एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १४ हजार ७९८ इतकी झाली आहे.नवी मुंबईत नऊ जणांचा मृत्यूनवी मुंबई : शहरात दिवसभरात उपचारादरम्यान ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा ६०४ वर पोहचला आहे. नवी मुंबई पालिकेने मृत्यूदर शुन्यावर आणण्याचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. आॅगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यात मृत्यूदर कमी करण्यात काही प्रमाणात यश आले. परंतु सद्यस्थितीमध्ये मृतांचा आकडा पुन्हा वाढला आहे.रायगडात २४ तासांत ६७० रुग्णांची नोंदअलिबाग : जिल्ह्यात बुधवारी (२ सप्टेंबर) ६७० नव्या कोरोना पॉझिटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. गेल्या पाच महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक उच्चांकी वाढ असल्याने जिल्ह्यात कोरोना चांगलाच फोफावत असल्याचे दिसून येते. दिवसभरात १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात बुधवारी अखेर बाधित रु ग्णांची संख्या २७ हजार ८६३ वर पोहोचली आहे. त्यापैकी २३ हजार ९२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे