शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: खोणीमध्ये १०० मजुरांची उपासमार; तीन दिवसांपासून अन्न नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:26 IST

जवळचे पैसेही संपल्याने नशिबी आल्या मरणयातना

- अनिकेत घमंडी डोंबिवली : सामाजिक संस्थेने अन्नपदार्थांचे वाटप बंद केल्यामुळे तीन दिवसांपासून खोणी, कल्याण ग्रामीण भागात सुमारे १०० हून अधिक मजुरांना अन्न मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. परिसरातील बांधकाम व्यावसायिकांकडे हाताला मिळेल ते काम करून गुजराण करण्याचे काम ते मजूर करत होते.लॉकडाउननंतर आतापर्यंत एका सामाजिक संस्थेकडून अन्न वितरित केले जात होते. परंतु, तीन दिवसांपासून ते बंद झाले आहे. त्यामुळे त्या मजुरांवर अन्नाविना दिवस काढण्याची वेळ ओढावली आहे. मजुरांची उपासमार होत असल्याची माहिती मिळताच एका दक्ष नागरिकाने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु, हा परिसर महापालिकेत येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे दक्ष नागरिकाने तहसीलदार दीपक काकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी समस्या सुटेल, असे सांगितले. परंतु, संध्याकाळपर्यंत मजुरांची समस्या सुटली नव्हती. त्यामुळे त्यांना अन्न कोण आणि कधी देणार, हा प्रश्न कायम होता.खोणीतील हे सर्व मजूर परिसरातच बांधकाम व्यवसायिकांकडे काम करतात. लॉकडाउनची समस्या निर्माण झाल्यानंतर त्यांच्या हाताचे काम गेले. त्यानंतर जवळपासचे अन्नधान्य संपल्यानंतर त्यांना एका संस्थेने अन्नाची पॅकेट्स पुरवली. आता मात्र पंचाईत झाली असल्याचे मजुराने सांगितले. तसेच जरी खोणी ग्रामपंचायत कार्यालयात शासनाने अन्न पदार्थ वितरणाची व्यवस्था केली असली तरीही त्या मजुरांच्या घरापासून ते कार्यालय सुमारे चार किमी लांब असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्याबाबत मजुरांना काहीही माहिती नसल्याचे निदर्शनास आले.आम्हाला खोणी परिसरात अन्नाची पॅकेट्स मिळत होती. तीन दिवसांपासून ते बंद झाले आहे. त्यामुळे जेवढे काही जवळ पैसे होते ते खर्च होत असून आता पुढे काय करावे, हा प्रश्न आहे. आमच्यासह सुमारे १०० मजुरांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. - राम आशीष, मजूरग्रामपंचायत कार्यालय, खोणी येथे कम्युनिटी किचनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या मजुरांनी त्या ठिकाणी जाऊन जेवण घ्यावे. अशा भागांमध्ये जे कोणीही गरजू असतील त्यांनी त्या कार्यालयात जाऊन अन्न घ्यावे. - दीपक काकडे, तहसीलदार