कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे शुक्रवारी एक हजार १०८ नवे कोरोना रुग्ण आढळले असून, २४ तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. उपचाराअंती बरे झाल्याने ७१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर भर पडल्याने सध्या नऊ हजार २३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या कोरोनाबाधितांची संख्या ८१ हजार १७९ वर पोहोचली आहे. यातील ७० हजार ६८२ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत, तर एक हजार २६२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कल्याण पूर्वेत १४६, डोंबिवली पूर्वेत ४०५, कल्याण पश्चिमेत ३६९, डोंबिवली पश्चिमेला १४२, मांडा-टिटवाळा ३४, तर मोहना येथे १२ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शुक्रवारी आढळलेली ही रुग्णसंख्या आजवरची एका दिवसातील सर्वोच्च रुग्णसंख्या आहे, तर ठाणे महापालिका हद्दीत २४ तासांत एक हजार ३७० रुग्ण आढळून आले.
--------------------------------