शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागातच कोरोनाचा रुग्ण, आरोग्य विभाग २४ तास ठेवणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:35 IST

ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता मुख्यालयातील आरोग्य विभागात काम करणाºया एका ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयात काम करणाºयांच्या मनातही धडकी भरली आहे.

ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे कार्यालय निर्जंतुकीकरणासाठी पुढील २४ तास बंद ठेवण्यात आले आहे. तर या महिलेच्या संपर्कात आलेल्या इतर चार ते पाच कर्मचाऱ्यांना घरातच क्वॉरान्टाइन करण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली. त्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.                 ठाणे महापालिका हद्दीत दिवसागणिक कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. तिकडे अत्यावश्यक सेवेत असलेले कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयातील परवाना विभागातील कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता मुख्यालयातील चवथ्या मजल्यावरील आरोग्य विभागही आता अडचणीत आला आहे. सध्याच या विभागातून शहरातील कोरोना विषयीची माहिती, आढावा घेतला जात आहे. तसेच कोरोनावर कशा पध्दतीने उपाय योजना करणे गरजेचे आहे, याविषयाचीही माहिती उपलब्ध होत आहे. परंतु आता याच विभागातील एका ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला लिपीक पदावर काम करीत असून ती कल्याण शहरात राहते. अशक्तपणा तसेच प्रकृती ठिक नसल्यामुळे शुक्र वारपासून ती कामावर येत नव्हती. त्यामुळे तिची करोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल बुधवारी आला असून त्यात तिला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिला उपचारासाठी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे असले तरी शुक्र वारपर्यंत ही महिला कामावर येत होती. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या चार ते पाच कर्मचाºयांना होम क्वॉरान्टाइन करण्यात आले आहे. तसेच त्यांचीही करोना चाचणी केली जाणार आहे. तर आरोग्य विभागाचे कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढील २४ तास बंद करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या