शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागांत अद्याप कोरोना लसीकरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:40 IST

वयोवृद्धांत चिंता : कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुरू

आरिफ पटेल

मनोर : पालघर पूर्व ग्रामीण भागात कोरोना लसीकरणासाठीची लस  अद्याप न पोहोचल्याने वयोवृद्ध व्यक्ती व अन्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाकडून कोणत्याच प्रकारची हालचाल होताना दिसत नाही. तसेच नेते, पुढारीसुद्धा काही हालचाल करताना दिसत नाहीत.

जिल्ह्यात ३४ केंद्रांमधून  कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून ३५ हजार  नागरिकांना लसीची पहिली मात्रा, तर ८ हजारहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा दिली गेली आहे, नगरपरिषद हद्दीत शहरी भागात  लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे, मात्र पालघर तालुक्यातील पूर्व जंगलपट्टी भागातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील गावपाड्यांवर अद्याप लस पोहोचलीच नाही. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले   आहे. ग्रामीण लसीकरण देण्यासाठी अजून आरोग्य यंत्रण सज्ज नाही. त्यांना प्रशिक्षण नाही म्हणून ग्रामीण भागात लसीकरणाच्या मोहिमेला विलंब होत आहे का? असे प्रश्नही सध्या  नागरिक करताना दिसत आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून लसीकरण सुरू आहे, मात्र ग्रामीण भाग लसीकरणापासून वंचित असून लवकरात लवकर लसीकरणाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे. 

सध्या मनोर परिसरासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी खंदारे यांना नियोजन करायला सांगितले आहे. मनोर ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे. लवकरात लवकर लसीकरणाला सुरुवात करू.- डॉ. मिलिंद चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर

टॅग्स :thaneठाणे