शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दुसऱ्या वर्षीही लागणार नववर्ष स्वागतयात्रेला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:54 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी ठाणे शहरात निघणारी स्वागतयात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही नववर्ष स्वागतयात्रेला परवानगी मिळणार नसल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या यात्रेचे मुख्य आयोजक श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाने या दिवशी स्वागतयात्रा न काढता सर्वांना मान्य होईल, असा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात शुक्रवारी सायंकाळी बैठक होणार आहे.

ठाणेकरांचा सहभाग असणारी स्वागतयात्रा कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता रद्द करण्यात आली आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्याने गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेपासून वर्षभरातील सर्व सण-उत्सवांनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना ब्रेक लागला होता. यंदा जानेवारी महिन्यात कोरोना आटोक्यात आल्याने स्वागतयात्रा होईल, असे वाटत होते. मात्र, फेब्रुवारी अखेरपासून मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा स्वागतयात्रेच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. नववर्ष स्वागतयात्रेत ठिकठिकाणांहून येणाऱ्या संस्था, चित्ररथ, आबालवृद्ध यांचा सहभाग असतो. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होण्याची दाट शक्यता असल्याने लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही यात्रा रद्द करण्यात आली. ठाणेकरांना स्वागतयात्रेचे विस्मरण होऊ नये म्हणून छोटेखानी कार्यक्रम करण्याचा न्यासाचा मानस आहे. अर्थात, त्यास परवानगी मिळणार का व त्या कार्यक्रमाचे स्वरूप कसे असणार, यावर सर्व अवलंबून असेल.  

यंदाची स्वागतयात्रा होणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. परंतु, सर्वांना मान्य असेल, सहभागी संस्था दूर जाणार नाहीत, असा कार्यक्रम करण्याची चर्चा सुरू आहे. अनेक प्रस्ताव आले आहेत. त्यावर, शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या बैठकीत एकमताने निर्णय घेऊ.- उत्तम जोशी, अध्यक्ष, श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे 

टॅग्स :thaneठाणे